इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅंडिस इंग्लंड टीमच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:20 PM2017-11-24T12:20:41+5:302017-11-24T12:24:24+5:30

whatsapp join usJoin us
England's goal of limiting cricket, David Warner's wife | इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य

इंग्लंड चाहत्यांकडून लिमिट क्रॉस, डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीला केलं लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा उप कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅंडिस इंग्लंड टीमच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. चाहत्यांच्या एका गटाने गाण्यांद्वारे त्यांना लक्ष्य केलं आहे. गाण्यात वॉर्नरच्या पत्नीच्या अफेअरचा उल्लेख आहे. सिडनीतील एका बारच्या टॉइलेटमध्ये ती लपून तिचा बॉयफ्रेंड सोनी बिल याला भेटली होती. त्यावेळी या घटनेची चांगलीच चर्चा झाली होती, त्या घटनेचा उल्लेख गाण्यात आहे. वर्ष 2008 मध्ये कॅंडिस रग्बी खेळाडू सोनी बिल याच्यासोबत रिलेशनमध्ये होती, 2015 मध्ये तिचं वॉर्नरसोबत लग्न झालं.  वॉर्नर आणि इंग्लंड टीमचा खेळाडू जो रूटसोबत वादाचा उल्लेखही गाण्यात आहे. 
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बहुचर्चित आणि प्रतिष्ठित अॅशेस टेस्ट सिरीजमधील ही घटना आहे. गुरूवारी ब्रिस्बेनमध्ये मॅच सुरू होती. चाहते मैदानात एकवटले होते. त्यापैकी काही जण गाणं गुणगुणत होते. गाण्याचे बोल होते...“डेवी वॉर्नर इज ओवर द हिल, केम सेकेंड टू सोनी बिल…।”  बार्मी आर्मी नावाने प्रसिद्ध असलेल्या चाहत्यांच्या गटाने गाण्याद्वारे थेट वॉर्नर आणि त्याच्या पत्नीवर निशाणा साधत होते. बार्मी आर्मी इंग्लंड क्रिकेट टीमच्या चाहत्यांच्या एक गट आहे. हा गट ज्या ठिकाणी इंग्लंडचा सामना असेल त्या ठिकाणी जाऊन संघाला समर्थन देत असतात. आपल्या खास गाण्यांसाठी हा गट ओळखला जातो. डेव पीकॉक हे या गटाचे संस्थापक आहेत.   
गाण्यांद्वारे वॉर्नरला लक्ष्य ठरवून करण्यात आलं. वॉर्नरने काही दिवसांपूर्वी बेन स्टोक्सची खिल्ली उडवली होती त्यानंतर वॉर्नरला लक्ष्य करण्याचं ठरवण्यात आलं असं बार्मी आर्मीकडून सांगण्यात आलं आहे.  
इंग्लंडची संथ सुरुवात, विंस व स्टोनमनची अर्धशतके- 
अ‍ॅशेज मालिकेत पदार्पणातच शतकाजवळ पोहोचलेल्या इंग्लंडच्या जेम्स विंस याला धावबाद करीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीच्या सुरुवातीच्या दिवशी पुनरागमन केले. कर्णधार जो रुट आणि अ‍ॅलेस्टर कुक हे दोघे स्वस्तात बाद झाले; परंतु विंस आणि मार्क स्टोनमन यांनी इंग्लंडचा डाव सावरला. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळी आधी संपला. त्या वेळेस इंग्लंडने ४ बाद १९६ धावा केल्या होत्या. विंस ८३ धावांवर बाद झाला. तो जोश हेजलवूड याच्या चेंडूंवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात नाथन लियोन याच्या थेटफेकीवर धावबाद झाला. त्याआधी लियोनच्या चेंडूंवर यष्टिरक्षक टीम पेन याने विंसला जीवदान दिले होते. त्या वेळेस तो ६८ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा फायदा घेत विंसने १७० चेंडूंत १२ चौकारांसह ८३ धावा केल्या.
इंग्लंडची सुरुवात खूप खराब झाली आणि तिसºयाच षटकात मिशेल स्टार्कने सलामीवीर अ‍ॅलेस्टर कुक याला तंबूत धाडले. त्या वेळेस धावफलकावर अवघ्या २ धावा होत्या. इंग्लंडच्या २०१०-२०११ च्या अ‍ॅशेज मालिकेतील ३-१ विजयाचा शिल्पकार राहिलेल्या कुकने त्या वेळेस ७६६ धावा केल्या होत्या; परंतु त्यानंतर तो चांगली कामगिरी करू शकला नाही. कुक परतल्यानंतर विंस आणि स्टोनमन यांनी दुस-या गड्यासाठी १२५ धावांची भागीदारी केली.
सराव सामन्यादरम्यान चार डावांत एक शतक व तीन अर्धशतके झळकावणारा स्टोनमन चहापानाला ५३ धावांवर बाद झाला. दुसरीकडे विंस याने त्याची याआधी कसोटीतील ४२ धावांची सर्वोत्तम खेळी मागे टाकत चांगली खेळी केली.
विंस बाद झाल्यानंतर १५ धावांवर रुटला पॅट कमिन्सने पायचीत केले. पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा डेव्हिड मालान २८ धावांवर खेळत होता आणि मोईन अली याने १३ धावा केल्या.
धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ८०.३ षटकांत ४ बाद १९६ धावा
(जेम्स विंस ८३, मार्क स्टोनमन ५३, जो रुट १५, डेव्हिड मालान खेळत आहे १८, मोईन अली खेळत आहे १३. पॅट कमिन्स २/५९, मिशेल स्टार्क 

Web Title: England's goal of limiting cricket, David Warner's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.