अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्यास इंग्लंड उत्सुक, आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील

इंग्लंड संघ मैदानाबाहेरील घटना विसरून शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसºया अ‍ॅशेस कसोटीत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:24 AM2017-12-02T01:24:19+5:302017-12-02T01:25:09+5:30

whatsapp join usJoin us
 England are eager to return to the Ashes series, trying to win against Australia | अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्यास इंग्लंड उत्सुक, आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील

अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्यास इंग्लंड उत्सुक, आॅस्ट्रेलियाविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅडलेड : इंग्लंड संघ मैदानाबाहेरील घटना विसरून शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसºया अ‍ॅशेस कसोटीत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
अष्टपैलू बेन स्टोक्सच्या निलंबनानंतर जॉनी बेयरस्टॉ हेडबट प्रकरणानंतर इंग्लंडचे लक्ष विचलित झाले होते. इंग्लंडला ब्रिसबेनच्या पहिल्या कसोटी सामन्यात १० गड्यांनी
पराभव स्वीकारावा लागला. अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्यास इंग्लंडला येथे कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. कारण तिसरा कसोटी सामना पर्थमधील वाका मैदानावर होणार आहे. येथे १९७८ नंतर इंग्लंडला विजयाची चव चाखता आलेली नाही.
बेयरस्टॉने आॅस्ट्रेलियाचा कॅमरान बेनक्रोफ्टला धडक दिली होती. त्यानंतर संघव्यवस्थापनाने खेळाडूंना रात्री बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. कृत्रिम प्रकाशझोतात खेळल्या जाणाºया पहिल्या अ‍ॅशेस कसोटीच्या माध्यमातून इंग्लंडला पुनरागमनची चांगली संधी आहे. कारण खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल राहील. अँडरसन व ब्रॉड यांनी एकूण ८९९ कसोटी बळी घेतलेले आहे. (वृत्तसंस्था)

आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेडमध्ये दिवस/रात्रीच्या दोन लढतींमध्ये न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. मैदानावरील कर्मचाºयांनी गुलाबी चेंडू लवकर खराब होऊ नये यासाठी खेळपट्टीवर अतिरिक्त हिरवळ सोडली आहे.

आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लिमनच्या मते मिशेल स्टार्क, जोश हेजलवुड व पॅट कमिन्स सारखेच प्रभावी ठरतील. लिमन म्हणाले,‘जिम्मी अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांना लाभ होईल, पण आमच्या गोलंदाजांनाही याचा फायदा मिळेल.’

Web Title:  England are eager to return to the Ashes series, trying to win against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.