...अखेर एली अवरामनं हार्दिक पांड्यासोबतच्या रिलेशनशिपवर केला खुलासा 

एली हार्दिकला कंपनी देण्यासाठी थेट दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर या चर्चेने जास्तच जोर पकडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 01:28 PM2018-02-12T13:28:35+5:302018-02-12T13:29:18+5:30

whatsapp join usJoin us
/elli-avrram-on-dating-rumours-with-indian-cricketer-hardik-pandya | ...अखेर एली अवरामनं हार्दिक पांड्यासोबतच्या रिलेशनशिपवर केला खुलासा 

...अखेर एली अवरामनं हार्दिक पांड्यासोबतच्या रिलेशनशिपवर केला खुलासा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल एली अवराम यांच्या अफेअर्सच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. हार्दिकचे नाव अभिनेत्री एली अवरामबरोबर जोडले जात असून दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा आहेत.  अभिनेत्री एली अवरामनं पहिल्यांदाच त्यांच्या नात्यावर बोलली आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत एलीनं हार्दिकसोबत्या रिलेशनशिपवर खुलासा केला आहे. 

मी आणि हार्दिक चांगले मित्र आहोत, आमचं एकमेंकासमोबत नाव जोडणं साहजिकच आहे. कारण ज्यावेळी तुम्ही प्रसिद्ध होता. त्यावेळी आपल्यासोबत आशा चर्चा होत राहतात. आशा चर्चेंना काही अर्थ नसल्याचे एली अवरमनं सांगितले. पुढे बोलताना ती म्हणाली की, अशा अफवा आणि चर्चेंना आम्ही थांबवू शकत नाही. आणि त्याला काही करुही शकत नाही. आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथे अशा चर्चा होतातच. 

एली पुढे म्हणाली की, पर्सनल आयुष्याविषयी मी प्रोफशनली बोलणार नाही. कोणाला काय विचार करायचाय तो करु द्या. त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. कारण मी कितीही सांगितले की हार्दिक माझा चांगाला मित्र आहे. तर कोणाला विश्वास बसणार नाही. अफवा आणि चर्चेला आपण काही करु शकणार नाही. त्या होतच राहणार. 

एलीनं रिलेशनशिपवर होणाऱ्या अफवावर एक मजेदार किस्सा सांगितला. ती म्हणाते, एकदा मी माझ्या भावासोबत जेवण करायला गेली होती. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात माझ्या भावाला माझा प्रियकर म्हणून छापण्यात आलं होतं. माझ्या बोटत असलेल्या अंगठीला पाहून कित्येकजण असे विचार करातात की माझी एन्गेजमेंट झाली आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की, मी लहानपणापासून आंगठी घालतेय. 

हार्दिक पांड्याचा भाऊ क्रृणाल पांड्याच्या लग्नामध्ये एली अवरामनं उपस्थिती दर्शवली होती तेव्हापासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उधान आलं होतं. डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये कुणालने पंखुडी शर्मासोबत लग्न केले. लग्नाच्या पूर्ण फंक्शनमध्ये एलीने मोठ्या उत्साहारत सहभाग घेतले. एलीने खूप एन्जॉय केले. याचबरोबर एली हार्दिकसोबत दुसऱ्या फॅमिली फंक्शनमध्ये हजर असते.  दोघांमधील वाढत्या जवळीकतेला बघून दोगे एकमेकांना डेट करतायेत अशा चर्चा उडाल्या होत्या.  पण आता एलीनं दोघात काही नसल्याचा खुलासा केला आहे.

दरम्यान, एली हार्दिकला कंपनी देण्यासाठी थेट दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर या चर्चेने जास्तच जोर पकडला होता. अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नीसोबत एली दक्षिण आफ्रिकेमध्ये भटकंती करत आहे. शिखर धवनची मुलगी रेहाच्या 13 व्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्येही ती सहभागी झाली होती. हार्दिक पांडयाचा भाऊ कुणा पांडयाच्या लग्नामध्ये सुद्धा एली दिसली होती. 

Web Title: /elli-avrram-on-dating-rumours-with-indian-cricketer-hardik-pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.