Elbow surgery rules Steven Smith out of IPL, set to delay his international return as well | स्टीव्ह स्मिथची आयपीएल मधून माघार, आंतरराष्ट्रीय पदार्पणही लांबणीवर
स्टीव्ह स्मिथची आयपीएल मधून माघार, आंतरराष्ट्रीय पदार्पणही लांबणीवर

सिडनी :  स्टीव्हन स्मिथ आगामी इंडियन प्रीमिअर लीगला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये त्याच्या कोपराला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलला मुकणार आहे. त्याशिवाय त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही लांबणीवर ढकलले आहे. चेंडु कुरतडण्या प्रकरणी स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

आयपीएलच्या 12 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने स्मिथला संघात कायम राखले. परंतु, दुखापतीमुळे त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याशिवाय तो पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतही खेळण्याची शक्यता कमीच आहे.  

राजस्थानला स्मिथच्या जागी योग्य पर्याय शोधावा लागणार आहे. स्मिथची गैरहजेरी अजिंक्य रहाणेसाठी डोकेदुखी ठरू शकते. 


Web Title: Elbow surgery rules Steven Smith out of IPL, set to delay his international return as well
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.