वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक

टी-२० तिरंगी मालिकेत शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत यजमान श्रीलंका संघ कमकुवत बांगलादेशविरुद्ध वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:07 AM2018-03-10T02:07:42+5:302018-03-10T02:07:42+5:30

whatsapp join usJoin us
Eager to maintain dominance | वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक

वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - टी-२० तिरंगी मालिकेत शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत यजमान श्रीलंका संघ कमकुवत बांगलादेशविरुद्ध वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे.
यापूर्वी भारताविरुद्ध विजय मिळवल्यामुळे श्रीलंका संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीतही श्रीलंका संघ कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील राहील. बांगलादेशविरुद्ध अलीकडच्या कालावधीतील श्रीलंका संघाची कामगिरी शानदार आहे. श्रीलंकेने बांगलादेशला त्यांच्याच भूमीत कसोटी व टी-२० मालिकेत पराभूत केल्यानंतर तीन देशांचा समावेश असलेल्या मालिकेतही अंतिम लढतीत पराभूत केले होते. यात सहभागी होणारा तिसरा संघ झिम्बाब्वे होता.
श्रीलंकेने सुरू असलेल्या मालिकेत पहिल्या लढतीत भारताविरुद्ध शानदार खेळ केला. कुसाल परेराच्या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने १७५ धावांचे लक्ष्य सहज गाठले. गोलंदाजीमध्ये दुष्मंत चमीरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला होता. भारतीय फलंदाजांविरुद्ध लेग स्पिनर जीवन मेंडिसनेही वर्चस्व गाजवले.
भारताविरुद्ध श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसाल मेंडिस व धनुष्का गुणतिलके यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. शनिवारच्या लढतीत ही जोडी संघाला चांगली सलामी देण्यास प्रयत्नशील राहील.
भारताच्या विजयानंतर कर्णधार दिनेश चांदीमलने म्हटले होते की, खेळाडूंना चांगले भासत आहे. त्याचे सर्व श्रेय प्रशिक्षक चंद्रिका हाथरुसिंघा यांना द्यायला हवे. ते यापूर्वी बांगलादेशचे प्रशिक्षक होते.
चांदीमल म्हणाला, ‘बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. सराव सत्रात संघ व्यवस्थापनाने चांगली कामगिरी केली. चंद्रिका हाथरुसिंगा शानदार आहेत. संघ म्हणून आम्ही किती चांगले आहोत, हे निकालावरून स्पष्ट होते.’
सातत्याने पराभूत होत असल्यामुळे बांगलादेश संघाचे मनोधैर्य ढासळलेले आहे. त्यांच्या फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये स्ट्राईक रोटेट करण्यात अडचण भासत आहे. त्यामुळे त्यांना आव्हानात्मक मजल मारता येत नाही. संघाला नियमित कर्णधार व स्टार खेळाडू शाकिब-अल-हसनची उणीव भासत आहे. गुरुवारी भारताविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाने फलंदाजांना दोषी धरले होते. महमुदुल्ला म्हणाला, ‘आम्ही निश्चितच चांगली फलंदाजी केली नाही. आम्ही आणखी धावा फटकावणे आवश्यक होते. कदाचित ३० धावा आणखी हव्या होत्या. स्ट्राईक रोटेट करणे आवश्यक आहे. डॉट चेंडूंमुळे आम्ही दडपणाखाली येतो.’
या लढतीत भारतीय संघाने १४० धावांचे लक्ष्य सहज गाठले. फिरकीपटूंना खेळताना भारतीय खेळाडूंना कुठली अडचण भासली नाही. वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि रुबेल हुसेनने दोन बळी घेत छाप सोडली.
(वृत्तसंस्था)

उभय संघ यातून निवडणार

श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), सुरंगा लकमल (उपकर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुलास परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामीरा, धनंजय डिसिल्वा.

बांगलादेश : महमुदुल्ला (कर्णधार), लिटन दास, तमीम इक्बाल, सौम्य सरकार, मुश्फिकर रहीम, सब्बीर रहमान, मुस्तफिजुर रहमान, रुबेल हुसेन, अबू जायेद, तास्किन अहमद, इमरुल कायेस, नुरूल हसन, मेहदी हसन, अरिफुल हक, नजमुल इस्लाम, अबू हिदर रॉनी.
 

Web Title: Eager to maintain dominance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.