कौंटीत न खेळल्याने फायदाच झाला - कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहली जखमी झाल्याने इंग्लंड दौऱ्याआधी कौंटी क्रिकेट खेळू शकला नाही; परंतु या दिग्गज फलंदाजाने कौंटीत न खेळल्याने फायदाच झाला असल्याचे म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:06 AM2018-06-23T04:06:04+5:302018-06-23T04:06:12+5:30

whatsapp join usJoin us
Do not play in county cricket: Kohli | कौंटीत न खेळल्याने फायदाच झाला - कोहली

कौंटीत न खेळल्याने फायदाच झाला - कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली जखमी झाल्याने इंग्लंड दौऱ्याआधी कौंटी क्रिकेट खेळू शकला नाही; परंतु या दिग्गज फलंदाजाने कौंटीत न खेळल्याने फायदाच झाला असल्याचे म्हटले आहे.
भारतीय संघ ब्रिटिश दौºयावर रवाना होण्याआधी कोहली पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘इंग्लंडमध्ये आम्ही जास्त सामने खेळलो नाहीत. आम्ही चार वर्षांनंतर तेथे खेळण्यास जात आहोत. त्यामुळे मी तेथे जाऊन परिस्थितीशी जुळवून घेऊ इच्छित होतो; परंतु जेव्हा अखेरच्या वेळेस खेळलो त्या वेळेस परिस्थिती कशी असते, हे विसरून जातो. मी सध्या असणाºया ११0 टक्के तंदुरुस्तीपेक्षा ९0 टक्के फिटनेससह गेलो असतो. मला दौºयासाठी ताजेतवाने राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तेथे कौंटी खेळण्यासाठी गेलो नाही ते फायद्याचेच झाले आहे.’
२0१४ च्या दौºयाचा उल्लेख केल्याबद्दल विराटने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मला वाटते अनेकांना प्रदीर्घकाळापासून इंग्लंड दौºयाची आठवण आहे. आम्ही २0१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलो व याचे आयोजन बांगलादेशमध्ये केले गेले नव्हते.’ या दौºयातील लक्ष्याविषयी तो म्हणाला, ‘इंग्लंडच्या आधीच्या दौºयातही हाच प्रश्न मला विचारण्यात आला होता. मी तेथे दौºयाचा आनंद घेईल, असे त्या वेळेस म्हटलो होतो. मी जेव्हा लयीत असतो तेव्हा मी चांगलो खेळतो याची मला जाण आहे. तेथे मला कसे आव्हान मिळेल हे मला माहीत आहे.’
डब्लीन येथे २७ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणाºया पहिल्या टी २0 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी खेळण्यास सज्ज असल्याचेही भारतीय कर्णधाराने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘आता माझी मान चांगली आहे. मी मुंबईत सहा ते सात सत्रांत झालेल्या सरावात सहभाग घेतला. मी चांगला सराव केला आणि मी आता पूर्णपणे सज्ज आहे.’

Web Title: Do not play in county cricket: Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.