...तर खेळण्याचा अधिकार नाही - जसप्रीत बुमराह; संघाचा आत्मविश्वास ढासळता कामा नये

भारताला दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक सुरुवातीची अपेक्षा नव्हती; पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते जर एका अपयशामुळे संघाचा आत्मविश्वास ढासळत असेल तर संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याचा हक्क नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:27 AM2018-01-12T02:27:27+5:302018-01-12T02:27:35+5:30

whatsapp join usJoin us
... do not have the right to play - Jaspreet Bumrah; Team confidence should not be degraded | ...तर खेळण्याचा अधिकार नाही - जसप्रीत बुमराह; संघाचा आत्मविश्वास ढासळता कामा नये

...तर खेळण्याचा अधिकार नाही - जसप्रीत बुमराह; संघाचा आत्मविश्वास ढासळता कामा नये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन : भारताला दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक सुरुवातीची अपेक्षा नव्हती; पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या मते जर एका अपयशामुळे संघाचा आत्मविश्वास ढासळत असेल तर संघाला कसोटी क्रिकेट खेळण्याचा हक्क नाही.
दक्षिण आफ्रिकेने केपटाऊनमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात भारताला चार दिवसांमध्ये ७२ धावांनी पराभूत करीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसरा कसोटी सामना येथे शनिवारपासून प्रारंभ होत आहे.
पहिल्या सामन्यात चार बळी घेणारा बुमराह म्हणाला, ‘एका सामन्यामुळे आत्मविश्वास ढासळत नाही. जर असे घडत असेल तर तुम्हाला खेळण्याचा अधिकार नाही. चुकांपासून बोध घ्या आणि आगेकूच करा. चूक केलेली नाही, असा कुठलाही खेळाडू नाही. हा चांगला सामना होता. त्यात मला बरेच काही शिकायला मिळाले. कारण यापूर्वी मी कधीच दक्षिण आफ्रिकेत खेळलेलो नव्हतो. त्यामुळे मला बरेच शिकायला मिळाले. आता आगेकूच करणे व दुसºया लढतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’
बुमराहने पहिल्या कसोटीतील सकारात्मक बाजूवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. पहिला बळी म्हणून एबी डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूला बाद करणे सकारात्मक आहे. बुमराह म्हणाला, ‘तो माझ्यासाठी संस्मरणीय क्षण होता. त्यानंतर आम्ही अनेक बळी घेतले. एक गोलंदाज म्हणून कुठल्याही लढतीनंतर मी अधिक उत्साहित किंवा निराश होत नाही. मी यानंतरच्या लढतीत आत्मविश्वासासह सहभागी होण्यास उत्सुक आहे.’
बुमराहसाठी पहिला कसोटी सामना संमिश्र यश देणारा ठरला. पहिल्या डावात त्याला विशेष यश मिळाले नाही; पण दुसºया डावात त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचे ६५ धावांत ८ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांना पहिल्या कसोटीत पहिल्या डावात खेळपट्टीच्या उसळीसोबत ताळमेळ साधता आला नाही. त्यामुळे यजमान संघाला २८६ धावांची मजल मारता आली.
बुमराह म्हणाला, ‘पहिल्या डावात काय चूक केली, याची आम्हाला कल्पना आली. त्यामुळे चौथ्या दिवशी आम्ही दोन्ही टोकाकडून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूच्या दिशा व टप्पा यावर लक्ष केंद्रित केले होते.’ (वृत्तसंस्था)

कुठल्याही नव्या देशामध्ये गेल्यानंतर तेथे आव्हान असते. खेळपट्टी व वातावरण वेगळे असते. त्यामुळे नव्या आव्हानांना सामोरे जाणे नेहमीच आवडते. जेवढे अधिक खेळतो तेवढी खेळपट्टीबाबत माहिती मिळते.’
- जसप्रीत बुमराह

Web Title: ... do not have the right to play - Jaspreet Bumrah; Team confidence should not be degraded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.