धवन संतुलित फलंदाज

सनरायजर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले. त्या आधी या कामगिरीसाठी संघाने आपला मार्ग स्वत: बनवला आहे. त्यांनी गुरुवारी मुंबई इंडियन्सवर धावांचा पाठलाग करत विजय मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:42 AM2018-04-14T01:42:35+5:302018-04-14T01:42:35+5:30

whatsapp join usJoin us
Dhawan balanced batsman | धवन संतुलित फलंदाज

धवन संतुलित फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-व्ही. व्ही.एस. लक्ष्मण लिहितात...
सनरायजर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले. त्या आधी या कामगिरीसाठी संघाने आपला मार्ग स्वत: बनवला आहे. त्यांनी गुरुवारी मुंबई इंडियन्सवर धावांचा पाठलाग करत विजय मिळवला.
लिलावापासून पाहिले तर, मी या संघातील फलंदाजी खोलवर आहे याची पुनरावृत्ती केली आहे. गोलंदाज, संघाच्या दोन्ही विजयात खंबीरपणे उभे राहिले. त्यात त्यांचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा महत्त्वाचा ठरतो. ते नेहमीच गडी बाद करण्याच्या दृष्टीने गोलंदाजी करतात आणि मला वाटते की निर्धाव चेंडू टाकणे हे यात फायदेशीर आहे. यात कौशल्य आणि अनुभव आहे. दुखापतीमुळे भुवनेश्वर खेळू शकला नाही तरीदेखील संदीप शर्माने दुसऱ्या सामन्यात उत्तम खेळ केला.
मी विशेषत: कौतुक करतो ते शिखर धवनच्या दमदार फलंदाजीचे. त्याची मानसिकताच खंबीर आहे. त्यामुळे धावा जमवण्यासोबतच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. त्याची ही मानसिकता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून दिसून आली आहे. तो याच मानसिकतेने सातत्याने खेळतो. तो त्याच्या तंत्रावरदेखील जास्त मेहनत घेत आहे. त्यामुळे त्याने सातत्याने धावा करत रहाव्या, अशी अपेक्षा आहे. धवन खेळपट्टीवर संतुलित असतो. त्यामुळे तो खेळपट्टीच्या दोन्ही बाजूने खोºयाने धावा करू शकतो. तो एक पूर्ण पॅकेज आहे आणि ही बाब सनरायजर्स आणि राष्ट्रीय संघासाठी खूपच चांगली आहे.
केन विल्यम्सनने संघाचे नेतृत्व चतुराईने, खंबीरतेने केले आहे. त्याने मैदानावर क्षेत्ररक्षणाची रचनादेखील उत्तम केली. दीपक हुड्डा याने दुसºया सामन्यात जबाबदारीने खेळ केला हे पाहणे सुखद होते. त्याने संघाला विजयापर्यंत नेले. आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षात त्याच्यावर मेहनत घेतली असून तो त्याची परतफेड करत आहे हे सनरायजर्ससाठी उत्साहवर्धक आहे.
मुंबईच्या मयांक मारकंडे हा आयपीएलच्या या सत्रातील प्रसिद्धी मिळालेला खेळाडू आहे. ही स्पर्धा अनोळखी खेळाडूलाही एका रात्रीतून प्रसिद्धी मिळवून देते. तो देशांतर्गत स्पर्धेत पंजाब संघाचा नियमित खेळाडूदेखील नाही, पण पहिल्या दोन सामन्यात त्याने अतिशय आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. हे उल्लेखनीय आहे. त्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.
पहिल्या आठवड्यात आयपीएलमध्ये बरेच मनोरंजक क्रिकेट बघायला मिळाले. मात्र चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंचा खेळ त्यांच्याच मैदानावर बघू शकणार नाही, याचे वाईट वाटते.

Web Title: Dhawan balanced batsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.