देवधर करंडक : भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघांदरम्यान आज लढत; उमेश, शमीला लक्ष वेधण्याची संधी

भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघ रविवारी देवधर ट्रॉफी स्पर्धेच्या सलामी लढतीत खेळण्यासाठी मैदानात उतरतील त्या वेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव या संधीचा लाभ घेत राष्ट्रीय वन-डे संघात स्थान मिळवण्यासाठी आपापल्या संघांतर्फे चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 08:10 AM2018-03-04T08:10:11+5:302018-03-04T08:10:11+5:30

whatsapp join usJoin us
 Deodhar Trophy: Match between India A vs India B | देवधर करंडक : भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघांदरम्यान आज लढत; उमेश, शमीला लक्ष वेधण्याची संधी

देवधर करंडक : भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघांदरम्यान आज लढत; उमेश, शमीला लक्ष वेधण्याची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

धरमशाला : भारत ‘अ’ आणि ‘ब’ संघ रविवारी देवधर ट्रॉफी स्पर्धेच्या सलामी लढतीत खेळण्यासाठी मैदानात उतरतील त्या वेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव या संधीचा लाभ घेत राष्ट्रीय वन-डे संघात स्थान मिळवण्यासाठी आपापल्या संघांतर्फे चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर उमेश व शमी या संधीचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रीय संघात तिसºया व चौथ्या स्थानासाठी दावेदारी सादर करण्यासाठी त्यांना लक्षवेधी कामगिरी करावी लागेल. उमेशचा दक्षिण आफ्रिका दौºयात वन-डे संघात समावेश नव्हता तर संघ व्यवस्थापनाने अखेरच्या वन-डेमध्ये शमीच्या स्थानी शार्दुला ठाकूरला संधी दिली.
रविचंद्रन अश्विनने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा फलंदाज अंकित बावणेच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघ अधिक मजबूत भासत आहे. कारण या संघात स्थानिक व ज्युनिअर पातळीवरील सर्व आघाडीचे खेळाडू आहेत.
भारत ‘अ’ संघात अंडर-१९ विश्वकपचा स्टार शुभमान गिल व पृथ्वी शॉ यांच्यासह आयपीएल स्पेशालिस्ट ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. उन्मुक्त चंदने विजय हजारे यांनी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. उन्मुक्त पृथ्वीच्या साथीने डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. गोलंदाजी विभागात भारत ‘अ’ संघात शमीच्या साथीने नवदीप सैनी व बासिल थम्पी यांचा समावेश आहे. शाहबाज नदीम एकमेव स्पेशालिस्ट फिरकीपटू राहील तर कृणाल पांड्या अष्टपैलू आहे.
त्या तुलनेत भारत ‘ब’ संघ कमकुवत भासत आहे. या संघात केवळ श्रेयस अय्यर आहे. त्याची नजर वन-डे संघात मधल्या फळीत स्थान मिळवण्यावर केंद्रित झाली आहे. महाराष्ट्राचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड, बंगालचा कर्णधार मनोज तिवारी व युवा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनच्या साथीने मुंबईतर्फे विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा सिद्धेश लाड या दिवस/रात्र सामन्यात फलंदाजी करणार आहे.
उमेश, सिद्धार्थ कौल आणि हर्षल पटेल हे तीन वेगवान गोलंदाज असून जयंत यादवला फिरकी गोलंदाजीमध्ये धर्मेंद्र जडेजाची साथ लाभेल.
 

Web Title:  Deodhar Trophy: Match between India A vs India B

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.