बुमराहच्या बेपत्ता आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बेपत्ता असलेल्या आजोबांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. 84 वर्षीय संतोक सिंह बुमराह यांचा मृतदेह साबरमती नदीत सापडल्याचे वृत्त आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 02:13 PM2017-12-10T14:13:11+5:302017-12-10T14:13:55+5:30

whatsapp join usJoin us
The dead body of Bumrahah found in the River Sabarmati | बुमराहच्या बेपत्ता आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

बुमराहच्या बेपत्ता आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद :  टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बेपत्ता असलेल्या आजोबांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. 84 वर्षीय संतोक सिंह बुमराह यांचा मृतदेह साबरमती नदीत सापडल्याचे वृत्त आहे. जसप्रीतचे आजोबा शुक्रवारपासून बेपत्ता होते. जसप्रीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उत्तराखंडहून अहमदाबादला आले होते. संतोक सिंह यांची मुलगी राजेंदर कौर यांनी ते हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. संतोक सिंह यांना जसप्रीत बुमराहला भेटू दिलं नाही. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संतोक सिंह त्यांच्या नातवाला म्हणजेच जसप्रीतला भेटायला उत्तराखंडहून अहमदाबाद येथे आले होते. जसप्रीत याचा वाढदिवस 5 डिसेंबर रोजी असतो. पण, त्यादिवशी त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे ते जसप्रीतच्या आईच्या शाळेत तिला भेटायला गेले होते. मात्र, जसप्रीतच्या आईने त्यांची भेट घ्यायला नकार दिला होता. शिवाय, आमच्या कुटुंबाशी संपर्क करू नका असंही सांगितलं होतं. त्यानंतर संतोक यांनी 8 डिसेंबर रोजी आपल्या दुसऱ्या मुलाशी संपर्क करून आपल्याला जसप्रीतला भेटायची इच्छा असल्याचं सांगितलं होतं. संतोक सिंह 1 डिसेंबरला मुलीच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी नातू जसप्रीत बुमराहला भेटायचे आहे, असे सांगितले; पण भेट होऊ शकली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. ते जसप्रीतच्या आईची भेट घेण्यासाठी शाळेतही गेले. पण त्यांनीही भेटण्यास नकार दिला. बुमराहचा मोबाइल क्रमांकही दिला नाही, असे राजेंदर कौर यांनी सांगितले.

Web Title: The dead body of Bumrahah found in the River Sabarmati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.