DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार 9 विकेट्स राखून विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, पण या सामन्यातील पराभवाने मात्र दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 08:01 PM2018-05-10T20:01:36+5:302018-05-11T01:07:04+5:30

whatsapp join usJoin us
DDVSRH, IPL 2018 LIVE: Delhi pitch Good for spin ... | DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला.

हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार 9 विकेट्स राखून विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, पण या सामन्यातील पराभवाने मात्र दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. रिषभ पंतच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर दिल्लीने 187 धावा फटकावल्या होत्या, पण त्याचे शतक यावेळी व्यर्थच ठरले.  188 धावांचे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवणार नाही, असे वाटत होते. पण सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला सहजपणे विजय मिळवून दिला. धवनने 50 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 92 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. विल्यम्सनने 53 चेंडूंत 8 चौकार आणि दोन षटकरांच्या जोरावर नाबाद 83 धावा फटकावल्या आणि धवनला सुरेख साथ दिली.

फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चौकार - षटकारांचा वर्षाव झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने रिषभच्या जोरावर २० षटकात ५ बाद १८७ धावांची मजल मारल्यानंतर हैदराबादने केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात १८.५ षटकामध्येच १९१ धावा फटकावल्या. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अ‍ॅलेक्स हेल्स (१४) स्वस्तात परतल्यानंतर धवन - विलियम्सन यांनी अखेरपर्यंत टिकून राहत दिल्लीला रडविले. धवनने ५० चेंडूत ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९२ धावांचा तडाखा दिला. तसेच तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विलियम्सनने ५३ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८३ धावा चोपल्या. या दोघांच्या झंझावातापुढे दिल्लीचे सर्वच गोलंदाज हतबल झाले. हर्षल पटेलने हेल्सच्या रुपाने मिळवलेला बळी वगळता इतर गोलंदाजांना छाप पाडता आली नाही.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर युवा रिषभने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना स्पर्धेत जबरदस्त मारा केलेल्या हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरश: धुतले. त्याने केवळ ६३ चेंडूत १५ चौकार व ७ षटकारांचा वर्षाव करताना नाबाद १२८ धावा कुटल्या. विशेष म्हणजे २० वर्षीय रिषभ स्पर्धा इतिहासात शतक झळकावणारा दुसरा युवा फलंदाज ठरला. याआधी २००९ मध्ये मनिष पांडेने वयाच्या १९व्या वर्षी
शतक ठोकले होते. पृथ्वी शॉ (९), जेसन रॉय (११) आणि श्रेयस अय्यर (३) स्वस्तात परतल्यानंतर दिल्लीची एकवेळ ८व्या षटकात ३ बाद ४३ अशी अवस्था झाली होती. यावेळी दिल्लीच्या दीडशे धावा होणेही कठीण दिसत होते. मात्र रिषभने एकहाती हल्ला चढवताना सामन्याचे चित्र पालटले. हर्षल पटेलनेही १७ चेंडूत २४ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. मात्र, धवन - विलियम्सन यांनी तुफानी फटकेबाजी करत रिषभचे झंझावाती शतक व्यर्थ ठरविले.

संक्षिप्त धावफलक 
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकात ५ बाद १८७ धावा (रिषभ पंत नाबाद १२८, हर्षल पटेल २४; शाकिब अल हसन २/२७) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १८.५ षटकात १ बाद १९१ धावा (शिखर धवन नाबाद ९२, केन विलियम्सन नाबाद ८३; हर्षल पटेल १/३२)

11.23 PM : हैदराबादचा दिल्लीवर 9 विकेट्स राखून विजय

11.18 PM : हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूंत 8 धावांची गरज

11.14 PM : हैदराबादला विजयासाठी 18 चेंडूंत 18 धावांची गरज

11.07 PM : हैदराबादला विजयासाठी चार षटकांत 24 धावांची गरज

- धवन आणि विल्यम्सन यांनी दमदार फलंदाजी करत हैदराबादला 16 षटकांत 1 बाद 164 अशी मजल मारून दिली.

10.57 PM : केन विल्यम्सनचेही चौकारासह अर्धशतक

- हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सननेही धवन सारखेच चौकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

10.48 PM : शिखर धवनने अर्धशतकाचा आनंद असा साजरा केला... पाहा व्हीडीओ



 

10.36 PM : शिखर धवनचे चौकारासह अर्धशतक

- धवनने 30 चेेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. या अर्धशतकामध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

रिषभ पंतने केले शतकाचे असे सेलिब्रेशन... पाहा हा व्हीडीओ



 

10.23 PM : हैदराबाद पाच षटकांत 1 बाद 38

- शिखर धवन आणि केन विल्यम्सन यांनी संयत फलंदाजी करत संघाला पाच षटकांत 38 धावा करून दिल्या.

10.10 PM : हैदराबादला पहिला धक्का; अॅलेक्स हेल्स बाद

- हर्षल पटेलने हेल्सला पायचीत पकडत हैदराबादला पहिला धक्का दिला.

दिल्लीत रिषभंच वादळ; दिल्लीचे हैदराबादपुढे 188 धावांचे आव्हान

नवी दिल्ली : गुरुवारी दिल्लीमध्ये वादळ घोंघावलं ते रिषभ पंतचेच. आपल्या जोरकस फटक्यांनी पंतने हैदराबादच्या गोलंदाजीतली हवा काढून टाकली.  त्याच्या या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला हैदराबादपुढे 188 धावांचे आव्हान ठेवता आले. रिषभने तुफानी फटकेबाजी करताना 56 चेंडूंत आपले पहिले शतक झळकावले. या शतकामध्ये 13 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक साकारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. शतकानंतर पंत अधिक आक्रमक झाला. भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या षटकात तर पंतने तीन षटकार आणि दोन चौकारांसह 26 धावांची लूट केली. पंतने 63 चेंडूंत 15 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 128 धावांची खेळी साकारली. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही आता पंतच्या नावावर जमा झाला आहे. 

9.36 PM : रिषभ पंतच्या वादळी शतकानंतर दिल्लीच्या 187 धावा

9.31 PM :  ग्लेन मॅक्सवेल बाद; दिल्लीला पाचवा धक्का

9.25 PM : रिषभ पंतचे 56 चेंडूत धडाकेबाज शतक

 - रिषभने तुफानी फटकेबाजी करताना 56 चेंडूंत आपले पहिले शतक झळकावले. या शतकामध्ये 13 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक साकारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

9.16 PM : दिल्ली 17 षटकांत 4 बाद 133

9.03 PM : षटकारासह रिषभ पंतचे दमदार अर्धशतक

- रिषभ पंतने षटकारासह 35 चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले.

9.02 PM : दिल्लीला चौथा धक्का; हर्षल पटेल बाद

- रिषभ पंतबरोबर योग्य समन्वय न झाल्याने हर्षलला धावबाद होत माघारी परतावे लागले.

8.51 PM : रिषभ पंतचे बाराव्या षटकात तीन चौकार

- रशिद खानच्या बाराव्या षटकात रीषभ पंतने तीन चौकारांसह 15 धावा लूटल्या.

8.40 PM : दिल्ली 10 षटकांत 3 बाद 52

8.31 PM : श्रेयस अय्यर OUT; दिल्लीला तिसरा धक्का

- दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने धावचीत होत आत्मघात केला. दिल्लीसाठी हा तिसरा धक्का होता. श्रेयसला तीन धावाच करता आल्या.

8.15 PM : सलग दुसऱ्या चेंडूवर शकिबला बळी; पृथ्वीनंतर जेसन रॉयला धाडले तंबूत

- चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शकिब अल हसनने जेसन रॉयला बाद करत सलग दुसऱ्या चेंडूवर बळी मिळवला. रॉयने दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या.

8.14 PM : पृथ्वी शॉ OUT; दिल्लीला पहिला धक्का

- शकिब अल हसनने चौथ्या षटकात पृथ्वी शॉला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने 9धावा केल्या.

सामन्यापूर्वी दिल्ली आणि हैदराबाद यांनी कसा केला सराव... पाहा हा व्हीडीओ



 

7.58 PM : दिल्लीची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकुल... कोण घेणार कुणाची फिरकी

7.30 PM : दिल्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली



 

आव्हान टिकवण्यासाठी दिल्लीला विजय आवश्यक; हैदराबादविरुद्ध आज सामना

नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत तळाला आहे, पण तरीही त्यांचे आव्हान संपुष्टात आलेले नाही. पण आज सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना त्यांनी गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल. दुसरीकडे हैदराबादचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे हा सामना जिंकून बाद फेरीचे तिकिट ते निश्चित करू शकतात.

दोन्ही संघ



 



 

 

दोन्ही संघाचे मैदानात आगमन



 

 

Web Title: DDVSRH, IPL 2018 LIVE: Delhi pitch Good for spin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.