दिवस - रात्र कसोटी सामन्याला नाराजीचे सूर, सीओएच्या भूमिकेचा बीसीसीआयचा विरोध

आॅक्टोबर महिन्यातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्रस्तावित दिवस - रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनावर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिल्यानंतरही प्रशासकांच्या समितीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:18 AM2018-02-24T03:18:36+5:302018-02-24T03:18:36+5:30

whatsapp join usJoin us
Day - The opposition to the BCCI's resignation of the Oversight of the night-game, the COA | दिवस - रात्र कसोटी सामन्याला नाराजीचे सूर, सीओएच्या भूमिकेचा बीसीसीआयचा विरोध

दिवस - रात्र कसोटी सामन्याला नाराजीचे सूर, सीओएच्या भूमिकेचा बीसीसीआयचा विरोध

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आॅक्टोबर महिन्यातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्रस्तावित दिवस - रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनावर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिल्यानंतरही प्रशासकांच्या समितीने (सीओने) घेतेलेल्या भूमिकेचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तीव्र विरोध केला आहे.
या सामन्याच्या आयोजनप्रकरणी निर्णय घेताना सीओए प्रमुख विनोद राय यांना डावलण्यात आल्याने नव्या वादला तोंड फुटले आहे. दरम्यान या सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी, सीईओ राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक (क्रिकेट) साबा करीम यांनी शास्त्री यांच्याशी संपर्क साधला होता. शास्त्री यांनी या संदर्भात म्हटले होते की, ‘दुसºया श्रेणीच्या संघाविरुद्ध (वेस्ट इंडिज) एखाद्या छोट्या शहरात या सामन्याचे आयोजन करुन यातील एक सत्र प्रकाशझोतात खेळवावे.’
या प्रकरणी कोणतीही कल्पना न देण्यात आल्याच्या कारणावरुन सीओए प्रमुख राय यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने प्रतिक्रिया दिली की, ‘निर्णयच्या प्रक्रीयेबाबत विचार केल्यास राय योग्य आहेत. नक्कीच याबाबत सीके खन्ना (कार्यवाहक अध्यक्ष) आणि अनिरुद्ध चौधरी (खजिनदार) यांनाही कल्पना द्यायला हवी होती. पण असे अमिताभ व राहुल यांनी केले नाही. (वृत्तसंस्था)


‘अनेकदा कार्यवाहक अध्यक्ष आणि खजिनदार यांना कोणतीही कल्पना न देता राय यांनी निर्णय घेतले आहेत. राय यांना आता अचानक असे वाटू लागले आहे की त्यांना गृहीत न धरता निर्णय घेण्यात आला,’ असेही बीसीसीआय अधिकाºयाने म्हटले.

Web Title: Day - The opposition to the BCCI's resignation of the Oversight of the night-game, the COA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.