आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड संकटात, अ‍ॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल

आॅस्ट्रेलियाने मोठी आघाडी मिळवल्यानंतर दुसºया डावात इंग्लंडचे चार फलंदाज बाद केले. याबरोबरच त्यांनी तिस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण केली. त्यांनी अ‍ॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:14 AM2017-12-18T00:14:10+5:302017-12-18T00:14:28+5:30

whatsapp join usJoin us
 In the Crisis against Australia, the Ashes will move towards the series | आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड संकटात, अ‍ॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल

आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड संकटात, अ‍ॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ : आॅस्ट्रेलियाने मोठी आघाडी मिळवल्यानंतर दुसºया डावात इंग्लंडचे चार फलंदाज बाद केले. याबरोबरच त्यांनी तिस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सामन्यावर पकड निर्माण केली. त्यांनी अ‍ॅशेस मालिका काबिज करण्याकडे वाटचाल केली आहे.
आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९ बाद ६६२ धावांवर डाव घोषित करीत २५९ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पावसामुळे दिवसाचा खेळ लवकरच संपवण्यात आला. तोपर्यंत इंग्लंडने ४ बाद १३२ धावा केल्या होत्या. जेम्स विन्सने ५५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील दोन्ही शतकवीर डेव्हिड मलान आणि जॉनी बेयस्ट्रो हे अनुक्रमे २८ व १४ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा संघ आता १२७ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे सहा फलंदाज बाकी आहेत. आॅस्ट्रेलियन संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. वाका मैदानावरील हा सामना जिंकत ते मालिका आपल्या नावे करतील.
दुसºया डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मार्क स्टोनमॅन केवळ चार धावांवर बाद झाला. अ‍ॅलिस्टर कुक (१४) हा अपयशी ठरला. त्याने मालिकेत १३.८३ च्या सरासरीने केवळ ८३ धावा केल्या.
धावफलक :
इंग्लंड पहिला डाव : ४०३ धावा. आॅस्ट्रेलिया पहिला डाव- बेनक्राफ्ट पायचित गो. ओवरटन २५, डेविड वार्नर झे. बेयस्ट्रो गो. ओवरटन २२, उस्मान ख्वाजा पायचित गो. वोक्स ५०, स्टिवन स्मिथ पायचित गो अ‍ॅँडरसन २३९, शॉन मार्श झे. रुट गो. मोईन २८, मिशेल मार्श पायचित गो. अ‍ॅँडरसन १८१, टिम पेन नाबाद ४९, मिशेल स्टार्क धावबाद ०१, पॅटकमिन्स पायचित गो. अ‍ॅँडरसन ४१, नाथन लियोन झे. मोईन गो. अ‍ॅँडरसन ०४. अवांतर-२२. एकूण १७९.३ षटकांत ९ बाद ६६२ (डाव घोषित) गोलंदाजी- अ‍ॅँडरसन ३७.३-९-११६-४, ब्रॉड ३५-३-१४२-०, वोक्स ४१-८-१२८-१, ओवरटन २४-१-११०-२, मोईन ३३-४-१२०-१, रुट ३-०-१३-०, मलान ६-१-१३-०. इंग्लंड दुसरा डाव : कुक झे. आणि गो. हेजलवुड १४, मार्क स्टोनमैन झे. पेन गो. हेजलवुड ३, जेम्स विन्स त्रिगो. स्टार्क ५५. ज्यो रुट झे. स्मिथ गो. लियोन १४, डेव्हिड मलान नाबाद २८, जॉनी बेयस्ट्रो नाबाद १४. गोलंदाजी- स्टार्क १०-३-३२-१, हेजलवुड ९-३-२३-२. मार्श ३-१-१४-०, कमिन्स ८.२-२-३१-०, लियोन ८-३-२८-१.

Web Title:  In the Crisis against Australia, the Ashes will move towards the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.