जगज्जेत्या इंग्लंडचे खेळाडू विक्रमांचे धनी

विश्वचषकातील पहिल्यांदाच सुपर ओव्हरमधील अंतिम सामना. अशा काही लक्षवेधी गोष्टींसह विश्वचषकाचा इतिहास. पण, या वेळी या चषकावर नवे नाव ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:03 AM2019-07-16T04:03:46+5:302019-07-16T04:04:02+5:30

whatsapp join usJoin us
The cricketers of the world are the richest cricketers of Vikram | जगज्जेत्या इंग्लंडचे खेळाडू विक्रमांचे धनी

जगज्जेत्या इंग्लंडचे खेळाडू विक्रमांचे धनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विश्वचषकातील पहिल्यांदाच सुपर ओव्हरमधील अंतिम सामना. अशा काही लक्षवेधी गोष्टींसह विश्वचषकाचा इतिहास. पण, या वेळी या चषकावर नवे नाव कोरले गेले ते इंग्लंडचे. यजमान जगज्जेते झाले आणि या जगज्जेत्या काही खेळाडूंनी यंदा विक्रमांचे इमले रचले. इंग्लंडच्या माजी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढण्यात आले. त्यावर एक नजर...
>83 विश्वचषक सामने
>विश्वचषकात सर्वाधिक धावा

556 जो रुट (२०१९)
>सर्वाधिक बळी
20 जोफ्रा आर्चर (२०१९)
यापूर्वी : इयान बॉथम :
१६ बळी (१९९२)
मार्क वूड आणि क्रिस वोक्स यांनी अनुक्रमे १८ अणि १६ बळी घेतले.
यापूर्वी : ग्रॅहम गुच ४७१ धावा (१९८७)
जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स
यांनी स्पर्धेत अनुक्रमे ५३२ आणि
४६५ धावा केल्या.
>यंदाची वैयक्तिक शतके
इंग्लंडकडून यंदा सात वैयक्तिक शतके ठोकली गेली. यापूर्वी : १९७५, १९८३, २००७ आणि २०१५ मध्ये प्रत्येकी दोन शतके होती. १९८७ ते २०१५ पर्यंतच्या आठ विश्वचषकांतील इंग्लंडकडून नोंदवलेली एकूण शतकांची संख्या ११ अशी आहे.
>76 षटकारांचा विक्रम यंदा इंग्लंडकडून
यापूर्वी : २००७ मध्ये २२ षटकार
इयॉन मॉर्गनने या स्पर्धेत सर्वाधिक २२ षटकार ठोकले. यापूर्वी इंग्लंडकडून अशी कामगिरी कुणालाही करता आली नाही.अफगाणिस्तानविरुद्ध इग्लंडने २५ षटकार ठोकले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एखाद्या संघाविरुद्धचे हे सर्वाधिक षठकार ठरले.

Web Title: The cricketers of the world are the richest cricketers of Vikram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.