The conspiracy has been made against me - Mohammad Shami | माझ्याविरुद्ध कट रचला गेला आहे - मोहम्मद शमी

नवी दिल्ली - सोशल मीडियावर गंभीर आरोप करीत पत्नी हसीनने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा खुलासा केला होता. पत्नीच्या आरोपांमुळे वैतागलेल्या शमीवर बीसीसीआयने नव्या करार यादीतून वगळल्याचा दुहेरी आघात झाला. एकाचवेळी दोन धक्के सहन करणाºया शमीने अखेर मीडियापुढे येत पत्नीने केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
एका पाकिस्तानी मुलीसोबत शमीचे अफेअर असून विविध मुलींसोबत ओळखी वाढविणे आणि त्यांच्याशी संबंध स्थापन करणे अशा कृत्यात मोहम्मद शमी गुंतला असल्याचे हसीनने बुधवारी मीडियापुढे म्हटले. पत्नीचे सर्व आरोप फेटाळताना शमीने हा माझ्याविरुद्ध रचलेला कट आहे. माझे करियर उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव असल्याचे म्हटले होते.माझ्याविरुद्धचे आरोप बिनबुडाचे असून हसीनने शमी पाच वर्षांपासून मला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आमच्या लग्नाला केवळ चार वर्षे झाली. इतक्या वर्षांपासून हे होत असेल तर आताच ते बाहेर का आले? या बाबी बाहेर येण्यास पाच वर्षे का लागली? मी सामान्य नागरिक आहे. सणासुदीला घरी असेल तेव्हा कुटुंबीयांसोबत राहतो. पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवितो.काही दिवसाआधी माझी पत्नी सोशल मीडियावर ट्रोल झाली त्यावेळी तिच्यासोबत खंबीरपणे उभा होतो आणि यापुढेही तिच्यासोबत उभा असेन,’ ज्या मोबाईलबाबत पत्नंी सांगते, तो माझा नाही. मी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या कशा काय स्वीकारू. तो माझा नंबर नाही. द. आफ्रिकेत हसीनने शॉपिंगसाठी हट्ट केला तेव्हा मी तिला घेऊन गेलो. निवडकर्ते माझ्यासोबत होते. शॉपिंग केली, ज्वेलरी घेऊन दिली. सोबत होळी साजरी केली. अचानक काय घडले हे मलाही ठाऊक नाही.’

याआधी, हसीनने काल कोलकाता येथे पत्रकारांसोबत बोलताना शमीला हवे होते ते सर्व काही मी केले. त्याच्या कुटुंबाकडून मात्र माझी कुचंबणा झाली. मला पत्नीसारखी वागणूक कधीही मिळाली नाही. शमी हा फसविणारा माणूस आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी त्याला तलाक देणार नाही. माझ्याकडे सबळ पुरावे असल्याने लवकरच शमीला कोर्टात खेचणार असल्याचे हसीनने सांगितले होते.


‘माझ्यावरील सर्व आरोप तथ्यहीन आहेत. मी हसीनसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिने फोन उचलला नाही. मी माझ्या सासºयांसोबत चर्चा केली. त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली. यावर लवकर
तोडगा निघेल अशी आशा आहे.’
- मोहम्मद शमी


Web Title:  The conspiracy has been made against me - Mohammad Shami
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.