मोहम्मद कैफ होणार या आशियाई संघाचा कोच

काही महिन्यांपूर्वीच आयसीसीने अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी खेळणाऱ्या देशांचा दर्जा दिला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकपदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफला गळ घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 08:15 PM2017-09-27T20:15:13+5:302017-09-27T20:16:03+5:30

whatsapp join usJoin us
The coach of the Asian team will be Mohammed Kaif | मोहम्मद कैफ होणार या आशियाई संघाचा कोच

मोहम्मद कैफ होणार या आशियाई संघाचा कोच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वीच आयसीसीने अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी खेळणाऱ्या देशांचा दर्जा दिला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकपदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफला गळ घातली आहे. भारताचे लालचंद राजपूत हे आतापर्यंत अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघत होते. मात्र राजपूत यांच्या कराराचं नुतनीकरण केलं जाणार नसल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरीही मोहम्मद कैफ हा स्थानिक रणजी सामन्यांमध्ये खेळतो. छत्तीसगड संघाचा प्रशिक्षक आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी सध्या मोहम्मद कैफकडे आहे. १३ कसोटी आणि १२५ वन-डे सामने खेळण्याचा मोहम्मद कैफला अनुभव आहे. या आठवड्या अखेरीस मोहम्मद कैफ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर स्वीकारल्यास मोहम्मद कैफ हा अफगाणिस्तानचा दुसरा भारतीय प्रशिक्षक ठरणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर स्वीकारल्यास मोहम्मद कैफला स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागेल. आयपीएलमध्ये मोहम्मद कैफने गुजरात लायन्स या संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. भारतीय संघात असताना मोहम्मद कैफ चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जायचा. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची ऑफर स्विकारल्यास मोहम्मद कैफ हा अफगाणिस्तानचा दुसरा भारतीय प्रशिक्षक ठरणार आहे.

Web Title: The coach of the Asian team will be Mohammed Kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.