भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार वागण्या-बोलण्याचे धडे... हार्दिक-राहुल इफेक्ट

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानानंतर भारतीय संघातील खेळाडूंना वागण्या-बोलण्याचे धडे शिकवण्याचा प्रस्ताव प्रशासकीय समितीने ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 09:11 AM2019-01-22T09:11:22+5:302019-01-22T09:12:43+5:30

whatsapp join usJoin us
CoA recommend behavioural counselling for Team India, Hardik Pandya-KL Rahul effect | भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार वागण्या-बोलण्याचे धडे... हार्दिक-राहुल इफेक्ट

भारतीय क्रिकेटपटूंना मिळणार वागण्या-बोलण्याचे धडे... हार्दिक-राहुल इफेक्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देहार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या विधानानंतर प्रशासकीय समितीनं उचललं पाऊलवरिष्ठ संघातील सदस्यांबरोबरच युवा खेळाडूंना मिळणार धडे

नवी दिल्ली : हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल केलेल्या विधानानंतर भारतीय संघातील खेळाडूंना वागण्या-बोलण्याचे धडे शिकवण्याचा प्रस्ताव प्रशासकीय समितीने ठेवला आहे. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील पांड्याच्या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पांड्यासह राहुललाही निलंबित केले. हे प्रकरण आता न्यायालयात गेले असून त्याला निकाल लवकरच अपेक्षित आहे. वरिष्ठ खेळाडूंसह सर्व वयोगटातील संघांना आणि भारताच्या A संघातील खेळाडूंनाही हे धडे गिरवावे लागणार आहेत.



''भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंसह उदयोन्मुख खेळाडू, A संघातील खेळाडू आणि 19 वर्षांखालील खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वागण्या-बोलण्याचे धडे दिले जाणार आहेत. व्यावसायिक खेळाडूने समाजात वावर करताना कसे राहावे याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये देण्यात येणार आहेत. यामध्ये लिंग संवेदनशीलता यावर वेगळे सत्र घेण्यात येणार आहे,''असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

पांड्या व राहुल यांच्यासाठी लिंग संवेदनशीलतेचे वेगळे सत्र भरवण्यात येणार का, यावर अधिकाऱ्याकडून नकारात्मक उत्तर मिळाले. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानानंतर पांड्या व राहुल यांच्यावर नेटिझन्स चांगलेच भडकले. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. '' पांड्या व राहुल यांच्यासाठी वेगळे सत्र भरवण्यात येणार नाही. भारताचे सर्व खेळाडू या सत्राला उपस्थित राहतील आणि ते दोघेही त्यांच्यासोबत असतील,'' अशी माहिती त्या अधिकाऱ्याने दिली. बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही पांड्या व राहुल प्रकरणानंतर युवा खेळाडूंना लिंग संवेदनशीलतेचे महत्त्व सांगण्यासाठी सत्र भरवावे, अशी मागणी केली होती. 

वरिष्ठ खेळाडूं सध्या दौऱ्यात व्यग्र आहेत आणि त्यामुळे ते सर्व सत्रांना उपस्थित राहु शकत नाही. हे सत्र 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या अधिक फायद्याचे ठरले आहे. एका माजी क्रिकेटपटूने सांगितले की,''17 वर्षीय प्रभ सिमरन सिंग ( किंग्ज इलेव्हन पंजाब 4.8 कोटी) आणि प्रयास राय बर्मन ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 1.6 कोटी) हे खेळाडू एकही रणजी सामना न खेळता कोट्याधीश झाले. अशा वेळी त्यांच्या डोक्यात हवा जाऊ नये, यासाठी त्यांचा मार्गदर्शनाची गरज आहे.'' 
 

Web Title: CoA recommend behavioural counselling for Team India, Hardik Pandya-KL Rahul effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.