कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?

चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 02:36 PM2019-03-01T14:36:37+5:302019-03-01T14:37:05+5:30

whatsapp join usJoin us
Chris Gayle hints at 'un-retirement' after six-laden 162 | कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?

कॅरेबियन वादळ वर्ल्ड कपनंतरही घोंगावणार; ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंट जॉर्ज, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड : चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्याख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी केली. गेलने या सामन्यात वन डेतील 10000 धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण 14 वा आणि ब्रायन लारानंतर विंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. जवळपास सहा महिन्यानंतर वन डे संघात परतलेल्या गेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धमाकाच उडवून दिला आहे. त्यामुळेच गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या विचारात आहे.



इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा गेलने केली होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यातील 162 धावांच्या खेळीनंतर वर्ल्ड कपनंतरही वन डे खेळत राहण्याचा विचार गेल करत आहे. तो म्हणाला,'' आतापर्यंतची ही माझी सर्वात दमदार खेळी ठरली. तो सामना अविस्मरणीय होता. मी आता बरेच ट्वेंटी-20 सामने खेळत आहे आणि त्यामुळे 50 षटकांच्या सामन्यात पुनरागमन करणे सोपं नक्कीच नाही. पण, आजूनही शरीर 50 षटकांच्या सामन्यांसाठी तंदुरूस्त आहे. वन डे सामन्यांसाठी आणखी थोडी मेहनत घेतल्यात मी काही काळ अजून खेळू शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पुढील निर्णय घेईन.'' 

39 वर्षे 159 दिवसाचा गेल वन डेत 10000 धावा करणारा वयस्कर खेळाडू ठरला. या शिखरासाठी त्याने पदार्पणापासून आतापर्यंत 7110 दिवसांचा कालावधी घेतला. चौथ्या वन डेत  14 षटकार ठोकून गेलने भारताच्या रोहित शर्माचा विक्रम मोडला. गेलने इंग्लंडविरुद्ध 71 षटकार खेचले आहेत आणि एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याने नावावर केला. रोहितन्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध 66 षटकार लगावले आहेत. 

पाहा व्हिडीओ...



 

 

Web Title: Chris Gayle hints at 'un-retirement' after six-laden 162

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.