इंग्लंडमध्ये पहिल्यांदा किवींना लोळवण्याचे भारतापुढे आव्हान

मिशन न्यूझीलंड : बेभरवशाच्या पावसाचाही करावा लागणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:11 AM2019-06-13T06:11:58+5:302019-06-13T06:13:15+5:30

whatsapp join usJoin us
Challenge India to launch Kiwis for the first time in England | इंग्लंडमध्ये पहिल्यांदा किवींना लोळवण्याचे भारतापुढे आव्हान

इंग्लंडमध्ये पहिल्यांदा किवींना लोळवण्याचे भारतापुढे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नॉटिंघम : जखमी शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने पर्यायी व्यवस्था केली असली तरी, गुरुवारी फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडचा भेदक मारा खेळण्यासह पावसाचे अवघड आव्हान विजयाच्या मार्गात येऊ शकते. सराव सामन्यात याच न्यूझीलंडकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. तसेच इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सावट या लढतीवरही आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे षटकांची संख्या कमी होऊ शकते. असे झाल्यास न्यूझीलंडचा वेगवान मारा भारतीय सलामीवीरांसाठी कठीण ठरू शकतो. रोहित शर्मासह लोकेश राहुल डावाला सुरुवात करेल, हे जवळपास निश्चित आहे.
रोहित-शिखर यांनी सलामीला ४,६८१ धावा केल्या असून, डावखुऱ्या फलंदाजाची उणीव भासेल. पण त्याचवेळी, भारताचा ‘प्लॅन बी’ किती सज्ज आहे, हेही आता पाहता येईल. राहुल सलामीला खेळणार असल्याने विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाला चौथ्या स्थानी संधी मिळेल. शंकरमध्ये अष्टपैलू क्षमता असून, कार्तिक अनुभवी आहे. काळे ढग लक्षात घेता फिरकी गोलंदाज कमी करून मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. शंकर आणि कार्तिक दोघेही खेळल्यास केदार जाधव बाहेर बसेल. स्पर्धेचा हा केवळ दुसरा आठवडा असल्याने संघात बदलाची हीच आदर्श वेळ आहे.

न्यूझीलंडचा दुसरा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन हा ट्रेंटब्रिजच्या खेळपट्टीवर खूश आहे. त्याला येथे लाभ होऊ शकतो. न्यूझीलंडने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. संघात उत्साह असून विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठीच खेळण्याचा निर्धार कर्णधार केन विलियम्सन याने व्यक्त केला आहे.

भारत-न्यूझीलंड लढतीवर पावसाचे सावट
भारत- न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाºया सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सामन्याच्या पूर्वसंध्येला अर्थात बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत तसेच गुरुवारी दुपारनंतर पावसाची शक्यता असल्याने कमी षटकांचा सामना होऊ शकतो. या आठवड्यात अनेकदा नॉटिंघममध्ये पाऊस कोसळू शकतो. गुरुवारी हलक्या सरी येतील. हवामान १० ते ११ अंश राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेड-टू-हेड
दोन्ही संघांदरम्यान
१०६ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी भारताने ५५ सामने, तर न्यूझीलंडने ४५ सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला असून ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील चार सामने भारताने जिंकले असून एका सामन्यामध्ये न्यूझीलंड जिंकला आहे.
दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत ७ सामने
झाले असून यातील ४ सामन्यांमध्ये न्यूझीलंडन, तर तीन सामने भारताने जिंकले आहेत.
भारताने आतापर्यंत दोन वेळा विश्वचषक जिंकला असून न्यूझीलंड एकदा उपविजेता राहिला आहे.
विश्वचषकामध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध २५२, तर न्यूझीलंडने भारताविरूद्ध २५३ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या केली आहे.
भारताची न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची नीचांकी असून न्यूझीलंडची नीचांकी धावसंख्या
१४६ आहे.

Web Title: Challenge India to launch Kiwis for the first time in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.