दिग्गज फलंदाज ब्रायन लाराची प्रकृती स्थिर

वेस्ट इंडिजचा माजी महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्याने मंगळवारी त्याला येथील रुग्णालयात दाखल केल. यानंतर, ‘आता मी ठीक असून बुधवारी हॉटेलमध्ये माझ्या रुमवर पोहचेन,’ असे लाराने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 03:48 AM2019-06-26T03:48:16+5:302019-06-26T03:49:01+5:30

whatsapp join usJoin us
Brian Lara's condition is stable | दिग्गज फलंदाज ब्रायन लाराची प्रकृती स्थिर

दिग्गज फलंदाज ब्रायन लाराची प्रकृती स्थिर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितल्याने मंगळवारी त्याला येथील रुग्णालयात दाखल केल. यानंतर, ‘आता मी ठीक असून बुधवारी हॉटेलमध्ये माझ्या रुमवर पोहचेन,’ असे लाराने सांगितले.

क्रिकेटविश्वातील महान फलंदाजांमध्ये समावेश असलेल्या ५० वर्षीय लाराने मुंबईत विश्वचषक स्पर्धेच्या कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. यानंतर त्याला परळ येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. छातीत दुखत असल्याने त्याला अस्वस्थ वाटत होते.
लाराने यानंतर रात्री एका व्हिडिओद्वारे म्हटले की, ‘जे काही झाले त्याने सर्वांची चिंता वाढली असेल याची मला कल्पना आहे. बहुतेक मी जिममध्ये अतिरिक्त वेळ दिला. छातीत वेदना होऊ लागल्याने मी डॉक्टरकडे जाण्याचे ठरविले. रुग्णालयातही वेदना कायम होत्या व यावेळी अनेक चाचण्या झाल्या.’

यादरम्यान लाराने रुग्णालयातही क्रिकेटचा आनंद घेतला. त्याने म्हटले की, ‘मी रुग्णालयात इंग्लंड विरुद्ध आॅस्टेÑलिया सामाना पाहिला. मी लवकरच ठीक होईन. काही चाचण्यांचे अहवाल आले असून डॉक्टरांनी चिंतेची बाब नसल्याचे सांगितले आहे.’

लाराचा व्हिडिओ संदेश मिळण्याआधी एका सूत्राने सांगितले होते की, ‘दोन वर्षांपूर्वी लाराची अँजियोप्लास्टी झाली होती आणि मंगळवारी तो नियमित तपासणीसाठी गेला होता. कारण नेहमी छातीत दुखण्याचा धोका असतो. तो ठीक असून त्याला लवकरच रुग्णालयातून रजा मिळेल.’

Web Title: Brian Lara's condition is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.