बोपन्ना - डोडिज उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा अनुभवी टेनिसस्टार रोहन बोपन्ना याने क्रोएशियाच्या इवान डोडिजसह खेळताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:02 AM2017-08-19T01:02:31+5:302017-08-19T01:02:31+5:30

whatsapp join usJoin us
Bopanna - Dodiya quarter-finals | बोपन्ना - डोडिज उपांत्यपूर्व फेरीत

बोपन्ना - डोडिज उपांत्यपूर्व फेरीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी टेनिसस्टार रोहन बोपन्ना याने क्रोएशियाच्या इवान डोडिजसह खेळताना सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. बोपन्ना -डोडिज यांनी चुरशीच्या झालेल्या सामन्यात जुआन सेबेस्टियन काबाल आणि फॅबियो फोगनिनी या जोडीचा पाडाव केला.
स्पर्धेत सातव्या मानांकन लाभलेल्या बोपन्ना - डोडिज यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना जुआन - फॅबियो यांचा ५-७, ७-५, १०-८ असा झुंजार पराभव केला. पहिला सेट गमावून पिछाडिवर पडलेल्या बोपन्ना - डोडिज यांनी जबरदस्त पुनरागमन करताना मोक्याच्यावेळी खेळ उंचाव्न जुआन - फॅबियो यांचे कडवे आव्हान परतावले. दुसरीकडे, सानिया मिर्झाने शुआई पेंग हिच्यासह इरिना कामेलिया बेगू - रालूका ओलारु यांना ६-३, ६-७, १०-३ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

Web Title: Bopanna - Dodiya quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.