बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कमीच आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 03:17 PM2019-04-27T15:17:07+5:302019-04-27T15:17:41+5:30

whatsapp join usJoin us
Bollywood actor kamal khan criticized on Virat Kohli | बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी

बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कमीच आहेत. बंगळुरू संघाची सुरुवातच निराशाजनक झाली. सलग सहा पराभवानंतर अखेरीस बंगळुरूची गाडी रुळावर आली खरी, परंतु त्याचा फार फायदा त्यांना होईल असे वाटत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कोहलीवर टीका होत आहे. त्यात बॉलिवूड अॅक्टर कमाल खान यानेही उडी घेतली आहे. 

कमाल खानने ट्विट केले की,''विराट कोहली असभ्य वर्तन करतो. त्याचा संघही आयपीएलमध्ये तळावर आहे. दुसरीकडे महेंद्रसिंग दोनीचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतही धोनीच कर्णधार असायला हवा.'' 



कमाल खानने या ट्विटवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी त्याने धोनी हा आताही सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सांगितले. याआधीही कमाल खानने कोहलीवर बोचरी टीका केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कप संघ जाहीर केला त्यावेळी कमालने ही संघ उपांत्य फेरीतही पोहचू शकत नाही, असे विधान केले होते. 

Web Title: Bollywood actor kamal khan criticized on Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.