मोठी गडबड! पंतप्रधानांच्या खास माणसानेच इम्रान खानऐवजी लावला सचिन तेंडुलकरचा फोटो

या पोस्टवरून हक हे चांगलेच ट्रोल झाले असून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 09:26 PM2019-06-22T21:26:45+5:302019-06-22T21:29:36+5:30

whatsapp join usJoin us
Big fuss! Prime Minister's Special Assistant name changed to Imran Khan instead of Sachin Tendulkar | मोठी गडबड! पंतप्रधानांच्या खास माणसानेच इम्रान खानऐवजी लावला सचिन तेंडुलकरचा फोटो

मोठी गडबड! पंतप्रधानांच्या खास माणसानेच इम्रान खानऐवजी लावला सचिन तेंडुलकरचा फोटो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खास सचिव नईम उल हक यांच्याकडून आज फार मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले. या चुकीनंतर हक सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण हक यांनी इम्रान खान यांच्याऐवजी थेट भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा फोटो पोस्ट केला आहे.

हक यांनी सचिनचा लहानपणीचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्यांनी इम्रान खान १९६९ असे लिहिले आहे. या पोस्टवरून हक हे चांगलेच ट्रोल झाले असून क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.



 



 



 

Web Title: Big fuss! Prime Minister's Special Assistant name changed to Imran Khan instead of Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.