खेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व शक्य - महेंद्रसिंग धोनी

‘खेळात कधी विजय मिळतो तर कधी पराभव पत्करावा लागतो. या दोन्ही निकालांना खेळाडू कसा सामोरे जातो, यावर त्या खेळाडूच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण अवलंबून असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:38 AM2018-11-22T01:38:28+5:302018-11-22T01:39:40+5:30

whatsapp join usJoin us
The best personality possible from the game-Mahendra Singh Dhoni | खेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व शक्य - महेंद्रसिंग धोनी

खेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व शक्य - महेंद्रसिंग धोनी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : ‘खेळात कधी विजय मिळतो तर कधी पराभव पत्करावा लागतो. या दोन्ही निकालांना खेळाडू कसा सामोरे जातो, यावर त्या खेळाडूच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण अवलंबून असते. आयुष्यातील वाटचालीत हवे असलेले शिक्षण खेळातून मिळू शकते. प्र्रत्येकाने खेळाकडे केवळ करियर, पैसा आणि प्रसिद्धी या चष्म्यातून न बघता उत्तम व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असलेले धडे कसे गिरविता येतील,’ यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी नागपुरात केले.
डोंगरगाव येथील गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरात एम. एस. धोनी क्रिकेट अकादमीचे उद्घाटन धोनीच्या हस्ते झाले. यावेळी धोनी म्हणाला, ‘क्रिकेट ‘रॉकेट सायन्स’ नाही. आमचा भर उत्कृष्ट प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यावर असेल. खेळाडूंच्या अडचणी समजून दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर या अकादमीचा भर असेल’.
या अकादमीत ७-१९ वर्षांखालील खेळाडूंना धडे मिळेल. सर्व अद्ययावत सोयीसुविधा युवा क्रिकेटपटूंना देण्यात येणार आहेत.
माहीची ‘कूल’ उत्तरे
माही त्याच्या ‘कूल’ स्वभावासाठी ओळखला जातो. मग शाळकरी मुलांच्या प्रश्नांनाही धोनीने अगदी त्याच्या खुमासदार शैलीत उत्तरे देत चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

.. आणि धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला
या कार्यक्रमाच्या ढिसाळ आयोजनाने धोनी नाराज झाला. डोळ्यादेखत खासगी सुरक्षारक्षकांकडून शाळेतील चिमुकल्यांना होणारा त्रास असह्य झाल्याने ‘माही’ने काही मिनिटांचा उद्घाटन सोहळा आटोपताच काढता पाय घेतला. धोनी नेमका कुठे गेला, हे काहीवेळ आयोजकांना माहिती नव्हते. मंचाजवळ हौशी प्रेक्षक मोबाईलमध्ये धोनीची झलक कैद करण्यास सरसावले. इतकी तुफान गर्दी झाली की सुरक्षेसाठी तैनात खासगी बाऊन्सर्सनी लोकांसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे धोनी काहीसा नाराज झाला होता.

Web Title: The best personality possible from the game-Mahendra Singh Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.