बीसीसीआयची वेबसाइट पुन्हा सुरू

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत वेबसाइट डोमेनचे नूतनीकरण न झाल्यामुळे १८ तासांपर्यंत आॅफलाइन राहिल्यानंतर आज वेबसाइटची सेवा पुन्हा सुरू झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:47 AM2018-02-06T03:47:23+5:302018-02-06T03:47:31+5:30

whatsapp join usJoin us
BCCI website resumes | बीसीसीआयची वेबसाइट पुन्हा सुरू

बीसीसीआयची वेबसाइट पुन्हा सुरू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत वेबसाइट डोमेनचे नूतनीकरण न झाल्यामुळे १८ तासांपर्यंत आॅफलाइन राहिल्यानंतर आज वेबसाइटची सेवा पुन्हा सुरू झाली.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने आपल्या वेबसाईटच्या नूतनीकरणाचे पैसे भरले नव्हते. या डोमेनला आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी खरेदी केले होते.
वेबसाइटची नोंदणी करणाºया रजिस्टर डॉट कॉम आणि नेमजेट डॉट कॉमने या डोमेनच्या नावाला सार्वजानिक बोलीसाठी ठेवले होते आणि त्यावर सात बोली लागल्या होत्या, त्यात सर्वांत मोठी बोली २७0 डॉलरची होती. हे डोमेन २ फेब्रुवारी २00६ पासून ते २ फेब्रुवारी २0१९ पर्यंत कायदेशीर आहे. अपडेट करण्याची तारीख ३ फेब्रुवारी २0१८ होती.
बोर्डाची ही वेबसाईट रविवारी सायंकाळपर्यंत चालू होऊ शकली नव्हती. सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे त्या वेळेस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे दुसरा वनडे खेळत होता.

Web Title: BCCI website resumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.