आॅस्ट्रेलिया - इंग्लंड चौथी कसोटी अनिर्णीत

स्टीव्ह स्मिथच्या २३ व्या कसोटी शतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखत इंग्लंडला सध्या सुरू असलेल्या मालिकेत विजयाची चव चाखण्यापासून रोखले. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 01:05 AM2017-12-31T01:05:12+5:302017-12-31T01:05:26+5:30

whatsapp join usJoin us
 Australia - England fourth Test drawn | आॅस्ट्रेलिया - इंग्लंड चौथी कसोटी अनिर्णीत

आॅस्ट्रेलिया - इंग्लंड चौथी कसोटी अनिर्णीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न - स्टीव्ह स्मिथच्या २३ व्या कसोटी शतकाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखत इंग्लंडला सध्या सुरू असलेल्या मालिकेत विजयाची चव चाखण्यापासून रोखले. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद १०२ धावांची खेळी केली. स्मिथचे या मालिकेतील हे तिसरे शतक आहे. 
स्मिथ आता मेलबोर्नमध्ये सलग चार कसोटी शतक झळकाविणारा डॉन ब्रॅडनमनंतरचा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने एका कॅलेंडर वर्षांत दोनदा सहा शतके झळकावण्याच्या रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आॅस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी केवळ दोन विकेट गमावल्या. त्यांनी दिवसअखेर दुसºया डावात ४ बाद २६३ धावा केल्या होत्या. मिशेल मार्श २९ धावा काढून नाबाद राहिला. 
आॅस्ट्रेलियाने पहिल्या तीन सामन्यात सरशी साधताना मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाचवा व अखेरचा कसोटी सामना पुढील आठवड्यात सिडनीमध्ये खेळला जाणार आहे.  बॉक्सिंग डे कसोटीच्या २० वर्षांच्या इतिहासात अनिर्णीत संपलेला हा दुसराच सामना आहे. (वृत्तसंस्था)


धावफलक : आॅस्ट्रेलिया पहिला डाव ३२७. इंग्लंड पहिला डाव ४९१. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव :- कॅमरुन बेनक्रॉफ्ट त्रि. गो. व्होक्स २७, डेव्हिड वॉर्नर झे. विंस गो. रुट ८६, उस्मान ख्वाजा झे. बेयरस्टॉ गो. अँडरसन ११, स्टीव्ह स्मिथ नाबाद १०२, शॉन मार्श झे. बेयरस्टॉ गो. ब्रॉड ०४, मिशेल मार्श नाबाद २९. अवांतर (४०). एकूण १२४.२ षटकांत ४ बाद २६३. गोलंदाजी : अँडरसन ४६-१, ब्रॉड ४४-१, व्होक्स ६२-१, कुरान ५३-०, अली ३२-०, मालान २१-०, रुट १-१.

Web Title:  Australia - England fourth Test drawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.