आॅस्ट्रेलियाने जिंकली टी-२० मालिका, न्यूझीलंड १९ धावांनी पराभूत; डकवर्थ- लुईस नियमांचा फटका

अ‍ॅस्टन एगरच्या मार्गदर्शनात गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माºयापाठोपाठ सलामीवीर डॉसी शॉर्टच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययात झालेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:55 AM2018-02-22T03:55:22+5:302018-02-22T03:55:25+5:30

whatsapp join usJoin us
Australia beat New Zealand by 19 runs, win T20 series; Duckworth-Lewis rules blow | आॅस्ट्रेलियाने जिंकली टी-२० मालिका, न्यूझीलंड १९ धावांनी पराभूत; डकवर्थ- लुईस नियमांचा फटका

आॅस्ट्रेलियाने जिंकली टी-२० मालिका, न्यूझीलंड १९ धावांनी पराभूत; डकवर्थ- लुईस नियमांचा फटका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आॅकलंड : अ‍ॅस्टन एगरच्या मार्गदर्शनात गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माºयापाठोपाठ सलामीवीर डॉसी शॉर्टच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययात झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे १९ धावांनी पराभव करून तिरंगी टी-२० मालिका जिंकली.
लहान सीमारेषेसाठी प्रसिद्ध असलेल्या ईडन पार्कवर आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला ९ बाद १५० धावांत रोखले. डावखुरा फिरकीपटू एगरने कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत २७ धावांत ३, तर केन रिचर्डसन आणि अ‍ॅन्ड्र्यू टाय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने ३८ चेंडूंत सर्वाधिक नाबाद ४३ धावा ठोकल्या. आॅस्ट्रेलियाने १४.४ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १२१ पर्यंत मजल मारताच पावसाने दुसºयांदा हजेरी लावली. खेळ पुन्हा सुरू होणार नसल्याची खातरजमा होताच आॅस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. पावसाच्या व्यत्ययानंतर आॅस्टेÑलियाला १०३ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण त्याहून अधिक धावा काढल्या असल्याने आॅसीचे जेतेपद निश्चित झाले.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघाचा हा पाचवा विजय असून या विजयासह आयसीसी टी-२० क्रमवारीत संघ दुसºया स्थानावर दाखल झाला. दोन्ही संघांचे १२६ असे सारखे गुण आहेत पण पाकिस्तान संघ त्यांच्या तुलनेत पुढे आहे. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावालक
न्यूझीलंड : २० षटकात ९ बाद १५० धावा (रॉस टेलर ४३, कॉलिन मुन्रो २९, मार्टिन गुप्तील २१; अ‍ॅश्टन एगर ३/२७, अँड्रयू टाय २/३०, केन रिचडर््सन २/३०) वि. पराभूत आॅस्टेÑलिया : १४.४ षटकात ३ बाद १२१ धावा (डी. शॉर्ट ५०, डेव्हिड वॉर्नर २५ ग्लेन मॅक्सवेल नाबाद २०; कॉलिन मुन्रो १/१८, इश सोढी १/२१, मिशेल सँटनर १/२९)

Web Title: Australia beat New Zealand by 19 runs, win T20 series; Duckworth-Lewis rules blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.