Asia Cup 2018: बांगलादेशच्या मश्रफे व मेहदी यांची भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी

Asia Cup 2018: बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ व मश्रफे मोर्ताझा यांनी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील लढतीत भारताविरुद्ध विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:17 PM2018-09-21T20:17:20+5:302018-09-21T20:17:37+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: Mashrafe Mortaza and Mehidy Hasan Miraz of Bangladesh record partnership against India | Asia Cup 2018: बांगलादेशच्या मश्रफे व मेहदी यांची भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी

Asia Cup 2018: बांगलादेशच्या मश्रफे व मेहदी यांची भारताविरुद्ध विक्रमी भागीदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ व मश्रफे मोर्ताझा यांनी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील लढतीत भारताविरुद्ध विक्रमाची नोंद केली. दोघांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून नवा विक्रम केला. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 150 धावांचा पल्ला पार केला. 



7 बाद 101 धावा असताना मेहदी फलंदाजीला आला. त्याने जोरदार फटकेबाजी करताना संघाच्या धावांचा वेग वाढवला. दोघांनी आठव्या विकेटसाठी केलेली अर्धशतकी भागीदारी ही भारताविरुद्धची सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी 2004 मध्ये खालेद महमुद व खालेद मसूद यांनी चितगावं येथे भारताविरुद्ध आठव्या विकेटसाठी 40 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. तो विक्रम आज मेहदी व मश्रफे यांनी मोडला.

Web Title: Asia Cup 2018: Mashrafe Mortaza and Mehidy Hasan Miraz of Bangladesh record partnership against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.