कोहलीवर आई कोपली; अनुष्कानं झापलेल्या तरुणाच्या आईकडून विरुष्काचीच कानउघाडणी

विराट व अनुष्काच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 01:51 PM2018-06-18T13:51:03+5:302018-06-18T13:51:03+5:30

whatsapp join usJoin us
Anushka Sharma, Virat Kohli attacked by mother of ‘shamed’ man, says fears for son’s safety | कोहलीवर आई कोपली; अनुष्कानं झापलेल्या तरुणाच्या आईकडून विरुष्काचीच कानउघाडणी

कोहलीवर आई कोपली; अनुष्कानं झापलेल्या तरुणाच्या आईकडून विरुष्काचीच कानउघाडणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई- गाडीमधून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीता अभिनेत्री अनुष्का शर्माने चांगलंच झापलं होतं. रस्त्यावर कचरा का फेकला? असा सवाल विचारत अनुष्काने त्याला खडे बोल सुनावले. अनुष्काचा पती विराट कोहलीने अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांना याबद्दलची माहिती करून दिली. रस्ता स्वच्छ ठेवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असं विराटने सांगायचा प्रयत्न केला. विराट व अनुष्काच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. कुणी विरूष्काला पाठिंबा दिला तर अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. विराटने व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही तासातच गाडीतून कचरा फेकणाऱ्या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट करत अनुष्काला टार्गेट केलं. 'तुझ्या तोंडातून जास्त कचरा पडला', अशा शब्दात त्याने अनुष्काला सुनावलं होतं. या सर्व टीकेनंतर आता गाडीतून कचरा फेकणारी व्यक्ती अरहान सिंग याच्या आईने आता विराट अनुष्काला टार्गेट केलं आहे.

गितांजली एलिझाबेथ असं त्या व्यक्तीच्या आईचं नाव असून त्यांनी विराट-अनुष्कावर सडकून टीका केली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी टीका केली. 'माझ्या मुलाचा चेहरा ब्लर न करता त्याचा व्हिडीओ शेअर तर केलाच पण त्याबरोबर तुम्ही त्याची चुकीची प्रतिमा समोर आणली. माझ्या मुलाने जे केलं त्याबद्दलचा काय पुरावा आहे का? मला आता माझ्या मुलाच्या सुरक्षेची काळजी वाटते, असं त्या मुलाच्या आईने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. 
या महिलेने विराट-अनुष्काला त्यांचा परिसर स्वच्छ करण्याचाही सल्ला दिला. तुम्ही स्क्रीनवर किंवा तुमच्या क्षेत्रात आणि घरात विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा असाल पण रस्त्यावर तुम्ही इतरांप्रमाणे सर्वसामान्य नागरिक आहात जे लोकांना चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण हे करताना दया दाखवा. कर्माची भीती असू द्या. तुमच्या माहितीसाठी, माझ्या मुलाने तुम्ही दोघं होतात म्हणून वाईट उत्तर दिलं नाही, असंही गितांजली एलिझाबेथ यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

गाडीतून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका व्यक्तीला फैलावर घेतानाचा अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा व्हीडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. अनुष्काचा पती विराट कोहली याने हा व्हीडिओ शूट करून ट्विटरवर शेअर केला होता. या व्हीडिओत अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तरूणाला जाब विचारताना दिसत होती. यावेळी रागाच्या भरात अनुष्काने या तरुणाला चांगलेच फैलावर घेतले होते. 

Web Title: Anushka Sharma, Virat Kohli attacked by mother of ‘shamed’ man, says fears for son’s safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.