कुलदीप यादवच्या यशामागे अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान - सुरेश रैना

सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 07:19 PM2017-10-12T19:19:40+5:302017-10-12T19:19:47+5:30

whatsapp join usJoin us
Anil Kumble's contribution to Kuldeep Yadav's success - Suresh Raina | कुलदीप यादवच्या यशामागे अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान - सुरेश रैना

कुलदीप यादवच्या यशामागे अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान - सुरेश रैना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून आपल्या फिरकीने तो भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान असून कुलदीपच्या यशाचे श्रेय कुंबळे यांना जाते, असे भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना याने सांगितले. 

मुंबईत गुरुवारी गोवा रिव्हर मॅरेथॉनची घोषणा रैनाच्या उपस्थिती करण्यात आली. यावेळी भारताची अनुभवी धावपटू कविता राऊतही उपस्थित होती. कुलदीपविषयी रैना म्हणाला की, ‘कुलदीप सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याची कामगिरी उंचावण्यासाठी अनिल भाईंनी खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलमध्येही मी त्याचा खेळ जवळून पाहिला असून अनेकवेळा चर्चा केली आहे. तसेच, ब्रॅड हॉगसारख्या अनुभवी गोलंदाज संघात असूनही त्याने आपली स्वत:ची ओळख निर्माण केले आहे. यामागे कुंबळे यांचीच मेहनत असून त्यांनीच कुलदीपला घडविले आहे. कुलदीपमुळे गोलंदाजीमध्ये खूप विविधता आली.’

सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या रैनाने आपल्या पुनरागमनाविषयी म्हटले की, ‘संघात परतण्यासाठी मी खूप मेहनत घेत असून लवकरच माझे पुनरागमन होईल. तसेच, सध्या मी देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून खेळाचा आनंद घेत आहे. मला दुखापतींने ग्रासले तेव्हा तो कठिण काळ होता, पण आता मी त्यातून स्वत:ला सावरले आहे.’ त्याचबरोबर रैनाने यावेळी बीसीसीआयने अनिवार्य केलेल्या ‘यो - यो’ चाचणीबाबत बोलणे टाळले. 

 ‘आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत असल्याचा आनंद आहे. महत्त्वाचे म्हणजे संघ विजयी होत आहे. जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मी देखील या संघाचा भाग असेल,’ असेही रैनाने यावेळी म्हटले. 

‘लोकमत’मुळे नाशिकमध्ये धावण्याची संधी

लोकमतच्या वतीने नुकताच झालेल्या नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेला नाशिकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचा यावेळी नाशिककरांनी अनुभव घेतला. आतापर्यंत आम्ही दुस-या शहरात मॅरेथॉनसाठी धावलो, पण लोकमत मॅरेथॉनच्या निमित्ताने मला माझ्या शहरात धावण्याची संधी मिळाली आणि याचा मी आनंद घेतला. 

- कविता राऊत, आॅलिम्पियन धावपटू

Web Title: Anil Kumble's contribution to Kuldeep Yadav's success - Suresh Raina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.