अजिंक्य रहाणेचा विचार व्हावा - सुनील गावसकर

भारत आणि द. आफ्रिका वाँडरर्सवर तिस-या तसेच निर्णायक कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. द. आफ्रिका मालिकेत वरचढ असल्याने विजयाच्या इराद्याने खेळणार तर भारताला इभ्रत शाबूत राखण्याचे आव्हान असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:31 AM2018-01-24T01:31:37+5:302018-01-24T01:32:07+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane should be considered - Sunil Gavaskar | अजिंक्य रहाणेचा विचार व्हावा - सुनील गावसकर

अजिंक्य रहाणेचा विचार व्हावा - सुनील गावसकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सुनील गावसकर लिहितात...
भारत आणि द. आफ्रिका वाँडरर्सवर तिस-या तसेच निर्णायक कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. द. आफ्रिका मालिकेत वरचढ असल्याने विजयाच्या इराद्याने खेळणार तर भारताला इभ्रत शाबूत राखण्याचे आव्हान असेल.
सर्वप्रथम सांगू इच्छितो, की सध्याच्या भारतीय संघाने राष्ट्रीय अभिमानासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावले आहे. संघाच्या कौशल्यावर शंका घेण्याचेही कारण नाही. पण एक बाब खटकली ती ही की, गोलंदाजांनी मिळविले ते फलंदाजांनी घालविले. रणरणत्या उन्हात गोलंदाजांनी मारा करीत द. आफ्रिकेला रोखण्यास घाम गाळला. क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ लाभली नाही. यजमान संघाच्या तळाच्या फलंदाजांना अतिरिक्त धावा काढण्यास वाव दिल्याचा फटका अखेर भारताला बसलाच. न्यूलॅन्डस्ची खेळपट्टी फलंदाजांना पूरक नव्हती. कोहली आणि डिव्हिलियर्ससारख्या मुरब्बी फलंदाजांना आपण कुठल्या चेंडूवर बाद होऊ, याबद्दल शंका वाटत होती. सेंच्युरियनच्या दुसºया कसोटीतही अखेरच्या दोन दिवसात खेळपट्टीने रंग बदलला. २५० धावांचा पाठलाग या खेळपट्टीवर सोपा गेला नाही.
आता वाँडरर्सच्या तिसºया आणि अखेरच्या कसोटीत काय होणार? ही खेळपट्टी सर्वात वेगवान आणि चेंडू उसळी घेणारी मानली जाते. अशा स्थितीत यजमान संघाच्या उत्साही पाठीराख्यांपुढे भारताचे काय होणार? कोहलीची एकट्याची शतकी खेळी भारतासाठी पुरेशी ठरणार नाही. विदेशात खेळताना केवळ पाच फलंदाजांसह उतरणे हितावह नाही. यजमान संघ केशव महाराजसारख्या फिरकी गोलंदाजाला बाकावर बसवून वेगवान मा-यास प्राधान्य देत असेल तर भारतानेही अजिंक्य रहाणेचा विचार करायलाच हवा. भारतीय संघ तिसºया सामन्यात अश्विनला वगळून पंड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवू शकतो. वाँडरर्सच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंसाठी काहीही नाही, अशी चर्चा असली तरी फिरकीपटूंशिवाय पाच दिवसांच्या सामन्यात खेळणे कठीण जाते, हे सत्य आहे. सेंच्युरियनच्या खेळपट्टीसारखा चेंडू येथेही वळण घेऊ शकतो. भारताला विजयाची ही अखेरची संधी असेल. द. आफ्रिका मात्र क्लीन स्वीपचे स्वप्न बाळगून आहे. (पीएमजी)

Web Title: Ajinkya Rahane should be considered - Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.