पहिल्या एकदिवसीय सामन्यात किवींविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड

यंदाच्या मोसमात एकतर्फी विजयांचा धडाका लावलेल्या भारतीय संघाचे पारडे रविवारपासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत नक्कीच वरचढ असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:22 PM2017-10-21T23:22:16+5:302017-10-22T07:19:07+5:30

whatsapp join usJoin us
Against Kiwi in the first ODI, Team India's Parade Judd | पहिल्या एकदिवसीय सामन्यात किवींविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड

पहिल्या एकदिवसीय सामन्यात किवींविरुद्ध टीम इंडियाचे पारडे जड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : यंदाच्या मोसमात एकतर्फी विजयांचा धडाका लावलेल्या भारतीय संघाचे पारडे रविवारपासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत नक्कीच वरचढ असेल. श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत क्लीन स्वीप दिल्यानंतर घरच्या मैदानावर विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियालाही भारताने सहज लोळवले. हाच फॉर्म भारतीय संघाने कायम राखल्यास किवी संघाला यजमानांना रोखणे अत्यंत कठीण जाईल. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारतीय संघ समतोल असून त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी प्रत्येक विजयामध्ये मोलाचे योगदान दिले असून हीच बाब भारतीय संघासाठी मजबूत आहे. एक संघ म्हणून विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शानदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे तीन वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवरच भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी, आफ्रिकेने ४०० हून अधिक धावांचा तडाखा देत भारताला सहजपणे पराभूत करीत मालिकाही जिंकली होती. मात्र या पराभवानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग तीन मालिका जिंकल्या असून न्यूझीलंडविरुद्धही भारताचाच विजय मानला जात आहे. दुसरीकडे, किवी संघाला माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरकडून सर्वाधिक आशा असेल. दुसºया सराव सामन्यात आक्रमक शतक झळकावताना त्याने भारताला एक प्रकारे इशाराही दिला. तसेच, टॉम लॅथमनेही आक्रमक शतक ठोकत न्यूझीलंड फलंदाजीची ताकद दाखवली आहे. त्याचप्रमाणे सलामीवीर मार्टिन गुप्टिल, कर्णधार केन विल्यम्सन यांच्यावर फलंदाजीची मदार असेल.

गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी हे भारतीय फलंदाजीला खिंडार पाडण्याची क्षमता राखून आहेत. तसेच, मिशेल सँटेनर आणि ईश सोढी या फिरकीपटूंवर मधल्या षटकांमध्ये भारताचा धडाका रोखण्याची जबाबदारी असेल.
>यातून निवडणार संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मनीष पांड्ये, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर.
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, अ‍ॅडम मिल्ने, कॉलिन मुन्रो, हेन्री निकोल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, ईश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वॉर्कर आणि टॉड अ‍ॅस्टल.

Web Title: Against Kiwi in the first ODI, Team India's Parade Judd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.