अफगाणिस्तानची आज कठीण परीक्षा, पदार्पणाच्या कसोटीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचे तगडे आव्हान

कागदावर कमकुवत विरुद्ध बलाढ्य संघांदरम्यानची लढत भासत असली तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल भारत आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असलेला अफगाणिस्तान संघांदरम्यान गुरुवारी एकमेव कसोटी सामना प्रारंभ होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:19 AM2018-06-14T05:19:19+5:302018-06-14T05:19:19+5:30

whatsapp join usJoin us
 Afghanistan's tough test, India's top challenge in debut Test | अफगाणिस्तानची आज कठीण परीक्षा, पदार्पणाच्या कसोटीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचे तगडे आव्हान

अफगाणिस्तानची आज कठीण परीक्षा, पदार्पणाच्या कसोटीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचे तगडे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बेंगळुरू - कागदावर कमकुवत विरुद्ध बलाढ्य संघांदरम्यानची लढत भासत असली तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल भारत आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असलेला अफगाणिस्तान संघांदरम्यान गुरुवारी एकमेव कसोटी सामना प्रारंभ होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध्यायाची सुरुवात होईल.
जास्तीत जास्त क्रीडा चाहत्यांचे लक्ष लियोनेल मेस्सी व ख्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यासारख्या दिग्गज फुटबॉलपटूंच्या खेळावर असेल त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना मात्र शिखर धवन व अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या फलंदाजांविरुद्ध राशिद खान फ्लिपर किंवा गुगलीचा वापर करताना बघणे आवडेल.
कुठलाही नवा संघ कुठल्याही स्वरुपामध्ये पदार्पण करतो त्यावेळी थोडा नर्व्हस असतो, पण युद्धाचे चटके सहन करणाऱ्या अफगाणिस्तानसोबत जुळलेल्या राजकीय व सामजिक किस्यांमुळे या सामन्याला वेगळा संदर्भ प्राप्त झाला आहे.
मैदानावर ही केवळ एक वेगळी कसोटी लढत आहे, पण याचे महत्त्व खूप वेगळे आहे. अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा १२ वा देश होणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात राशिद, मजीब जादरान व मोहम्मद शहजाद यांच्यासारखे खेळाडू सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील राहतील.
भारत अफगाणिस्तानचा चांगला मित्र देश आहे. बीसीसीआयनेही त्यांच्यावर दया दाखविताना राष्ट्रीय संघाला सरावासाठी आपले स्टेडियम्स उघडे करून दिले. पण, गुरुवारी ज्यावेळी लढत सुरू होईल त्यावेळी भारत आपल्या त्यांच्याविरुद्ध कुठली नरमाईची भूमिका घेणार नाही, हे नक्की. विराट कोहली, भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांच्याविना खेळणारा भारतीय संघ इंग्लंडच्या खडतर दौºयापूर्वी येथे मोठा विजय मिळवण्यास प्रयत्नशील राहील.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव.
अफगाणिस्तान : अशगर स्टेनिकजई, मोहम्मद शहजादस जावेद अहमदी, रहमत शाह, एहसानुल्लाह जनात, नासीर जमाल, हशमतुल्ला शाहिदी, अफसर जजाई, मोहम्मद नबी, राशिद खान, जहीर खान, अमीर हमजा होताक, सैयद अहमद शिरजाद, यामिन अहमदजई वफादार, मुजीब उर-रहमान.

स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु. वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून
 

Web Title:  Afghanistan's tough test, India's top challenge in debut Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.