अफगाणचा शहजाद निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 2:37am

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज अहमद शहजादला डोपिंगमध्ये अपयशी ठरल्यावर एक वर्षासाठी निलंबित केले आहे.

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज अहमद शहजादला डोपिंगमध्ये अपयशी ठरल्यावर एक वर्षासाठी निलंबित केले आहे. आयसीसीने म्हटले की, ‘शहजाद याने अनवधनाने प्रतिबंधित पदार्थ हायड्रोक्सिकटचे सेवन केले होते. तो वजन कमी करण्यासाठी औषधे घेत होता. ’ शहजाद याने आतापर्यंत ५८ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. हा २९ वर्षांचा क्रिकेटर आयसीसी डोपिंगविरोधी संहितेच्या अनुच्छेद २.१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. दुबईत १७ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत शहजादच्या नमुन्यात क्लेनबुटेरोलचे सेवन केले होते. वाडाने हे औषध प्रतिबंधित केले आहे. आयसीसीने म्हटले की, ‘शहजादने आपली चूक मान्य केली आहे. त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्याच्यावर १७ जानेवारी २०१७ पासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो १७ जानेवारी २०१८ ला पुनरागमन करू शकतो.’

संबंधित

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश
सचिन तेंडुलकरचा असाही 'कार'नामा!
वाढदिवसादिवशीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उडवली सचिनची खिल्ली, फॅन्सनी ट्विटरवर केली धुलाई 
... तर विराटबरोबर शॅम्पेन पिऊन सेलिब्रेशन करीन- सचिन तेंडुलकर
आपल्या वाढदिवशीच सचिनने भारतीयांना दिली होती 'ही' अविस्मरणीय भेट

क्रिकेट कडून आणखी

क्रिकेट विश्वचषक 2019: बीसीसीआयपुढे आयसीसी नमली; भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल
IPL 2018 : एबी डी' व्हिलियर्सने जाहीर केले आपले ' सिक्रेट '
क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे युवराज सिंगचे संकेत
IPL 2018 : हैदराबादला झटका, मुंबईविरोधात भुवनेश्वर कुमार बाहेर
IPL 2018 : पहिल्या सामन्यात पृथ्वीने केला पराक्रम, रिषभ पंतला टाकले मागे

आणखी वाचा