18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात 

न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं 18 चेंडूत 50 धावा करत 2018ची दमदार सुरुवात केली. यावेळी त्यानं  सात चौकार आणि तीन षटकार ठोकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 02:58 PM2018-01-01T14:58:33+5:302018-01-01T15:02:01+5:30

whatsapp join usJoin us
18th Century, a good start of the new year | 18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात 

18 चेंडूत झळकावलं अर्धशतक, नव्या वर्षाची दमदार सुरुवात 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली - न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं 18 चेंडूत 50 धावा करत 2018ची दमदार सुरुवात केली. यावेळी त्यानं  सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. वेस्ट इंडिजविरोधात सुरु असलेल्या 2018 या वर्षातील पहिल्या टी-20 सामन्यात कोलिन मुन्रोनं हा पराक्रम केला. 

वेस्ट इंडिजविरोधात सुरु असेल्या टी-20 सामन्यात मुन्रोनं 23 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांसह 286च्या स्ट्राइक रेटनं 66 धावा पटकावल्यात. यावेळी त्यानं फक्त चार वेळा एकेरी धाव घेतली.  त्याबरोबरच 2018 मध्ये पहिलं अर्धशतक मुन्रोच्या नावावर जमा झालं आहे. त्याचप्रमाणे मुन्रोनं जगातील सहावे तर न्यूझीलंडकडून दुसरे जलद अर्धशतक झळकावलं. मुन्रोच्याआधी गेल (17 चेंडू),  मायबर्घ (17 चेंडू), स्टर्लिंग (17चेंडू), मुन्रो (14 चेंडू) आणि युवराज सिंह (12 चेंडू) यांनी जदल अर्धशतक ठोकली आहेत.  

न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतक मुन्रोच्याच नावावर आहेत. 2016 मध्ये मुन्रोनं लंकेविरोधात 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर मार्टिन गप्टिल आहे. गप्टिलनं 2016मध्येच लंकेविरोधात 19 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.  

दरम्यान, सध्या पावसाच्या व्यत्ययामुळं सामना थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडनं नऊ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 102 धावा केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन 17  आणि एके. किचन एक धावांवर खेळत आहेत.  

Web Title: 18th Century, a good start of the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.