कॅम्पसमधल्या आनंदमेळ्यात चहा विकला तेव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, September 21, 2017 5:06pm

कॉलेजातल्या आनंदमेळ्यानं मार्केटिंगच नाही तर मैत्रीही शिकवली.

-अश्विन उमाळे

विद्याभारती महाविद्यालय अमरावती, आनंदमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एकुण  151 स्टॉल्स. 600 हून अधिक सहभागी सदस्य.  अतिशय उत्साहात सुरु वात झाली.  शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरिक्षत व्यवहार.  ठरल्याप्रमाणे विद्यार्थी कॉलेज मध्ये आपल्या स्टॉल्सला आवश्यक असे साहित्य घेऊन येत होते. मग स्टॉल्सचं डेकोरेशन.  हा माझ्या आवडीचा प्रकार. हे इथे लाव, ते तिथे चांगलं नाही दिसत आहे, थोडं आणखी क्रिएटिव्ह करू. असं चांगलं दिसेल का? आणि खूप काही.   खूप गर्दी झाली होती.  अण्डर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटचे सारे विध्यार्थी आपापल्या कामात मग्न होते. पण मी हे बघितलं की,   कॉलेज मध्ये 2-2  महिने लागतात मुलामुलींना कॅम्पसमध्ये मध्ये मिसळण्यासाठी. दोस्ती होण्यासाठी. कोणी कोणी तर फक्त परीक्षा किंवा काही कामासाठीच दिसतात कॉलेज मध्ये. पण आज, निव्वळ एका महिन्यातच किती जवळीक वाटते आहे.  तर गोष्ट आमच्या  स्टॉल नंबर 129 ची. आम्ही खूप सारे  पदार्थ सूचवले सरांना पण त्यातून फायनल झालं फक्त चहा आणि सूप.   झालं तर थंड सरबत वेळे वर ठरलं.  स्टॉलचं नाव सूर्र्र्र के पियो.... चहा. आपलं राष्ट्रीय पेय. संपूर्ण आनंद मेळ्याच आमचाच एक चहाचा ठेला. आम्ही लागलो कामाला. किचनवाल्यांनी अगदी दर्जेदार आणि  उत्कृष्ट असा चहा, सूप व थंड सरबत विथ क्रिम बनवलं. सव्र्ह करणार्‍यांनी, कूपन फाडणार्‍यांनी आपली  जबाबदारी निभावली. आम्ही मार्केटिंगवाले.   मी सुद्धा मार्केटिंग मधेच होतो.  प्रॉडक्ट विकायची मोठी स्ट्रॅटेजीच आमची. आम्ही एमबीएच्या विद्याथ्र्यानी चहा वर शेरोशायरी, त्यानंतर रेल्वे स्टेशन वर जसे विकतात तसे ओरडणे, कॉर्पोरेट  स्टॅंडर्ड रीतीने विकणे. सर्वच मार्ग स्वीकारले. खूप मार्केटिंग केलं. बाकी स्टॉलवर काय काय आहे हे कोणाला माहित असेल किंवा नसेल पण  129 वर मस्त गरम गरम चहा मिळतोय हे मात्न अख्या कॉलेज ला कळून चुकलं होतं. बाकी .  पण खूप मस्त चालत होतं. राजस्थानी पेहराव केलेले चौकी धाम, पारंपरिक खाद्य, पाणीपुरी, भेळ  असे सगळेच होते. पण आम्ही चायवाले छा गये.  सगळीकडे आमच्या मार्केटिंगचीच चर्चा. मग आनंद मेळा संपला.  काही मिनिटे मुले मुली डीजे वर खूप नाचली. मी नाही नाही नाचलो. मला नाचत नाही येत. मी व्हि डिओ  करत होतो. इथे झाली लिहिण्यासारखी गोष्ट.  सगळ्यांना वाटत होतं, आपल्याला काय बक्षिस समारंभाचं, आपल्याला कुठं मिळणार आहे.  आम्ही फक्त इतरांसाठी मनापासून टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देणार होतो.  दुपारभर चहा बनवून, विकून,  ओरडून, नाचून आम्ही इतके थकलो होतो की आता सेल्फी मध्ये थकवा दिसत होता.  आणि मग एकेक करत बक्षिसं जाहीर झाली. आणि शेवटचं बक्षीस जाहीर झालं स्टॉल नंबर 129 ला.  एक आनंदाची लहर उठली.  मुरझाये हुए फुल फिरसे खील गये.  पायात अचानक गती आली. धावलो सगळे स्टेज जवळ.  मग रात्नी ग्रुप वर मेसेजचा पाऊस. सगळे इतके थकले होते  तरीही कोणाला झोप येत नव्हती. आणि त्यातून एक गोष्ट घडली, आम्ही सारे एकमेकांचे मस्त मित्र बनलो. कॅम्पसने मार्केटिंगच नाही तर दर्यादिल मैत्रीही शिकवली.  

संबंधित

बोलेरो टॉप्स : TRY IT
ग्राफिक टीशर्ट घालताय पण ‘हे’ सांभाळा!
ग्राफिक टी’ज् : एक नवीन स्टाईल स्टेटमेण्ट
फ्रेण्डशिप डे चं प्लॅनिंग करताय?- या घ्या काही प्लॅनिंगच्या आयडिया!
रंगीत वॉटरप्रुफ काजळ कॅम्पसमध्ये हिट!

कॉलेज कॅम्पस कडून आणखी

बोलेरो टॉप्स : TRY IT
ग्राफिक टीशर्ट घालताय पण ‘हे’ सांभाळा!
ग्राफिक टी’ज् : एक नवीन स्टाईल स्टेटमेण्ट
फ्रेण्डशिप डे चं प्लॅनिंग करताय?- या घ्या काही प्लॅनिंगच्या आयडिया!
रंगीत वॉटरप्रुफ काजळ कॅम्पसमध्ये हिट!

आणखी वाचा