कॅम्पसमधला डिव्हायडर नावाचा कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:46 PM2017-08-19T17:46:46+5:302017-08-19T17:46:53+5:30

फार कमी काळ येतात हे कॅम्पसचे दिवस आयुष्यात

The name of the davidder named Campus | कॅम्पसमधला डिव्हायडर नावाचा कट्टा

कॅम्पसमधला डिव्हायडर नावाचा कट्टा

Next
ठळक मुद्दे दोस्तांची भेटण्याची, जगण्याची जागाच म्हणजे हा डिव्हायडर कट्टा

-कानिफनाथ उगले.

श्रीगोंदा,जि-अहमदनगर

मी काँलेजच्या गेटवर पोहोचलो तेव्हा नुकतंच कॉलेज सुटलं होतं. संथ गतीने वारा वाहत होता. झाडांच्या पानांची सळसळ ऐकु येत होती. ग्राऊण्डवरची  वरची लालमाती हवेच्या झोक्याबरोबर वर उडत होती. डिव्हायडरवर बीईची चार-दोन पोरं-पोरी बसली होती. मीही त्या डिव्हाईडवर वर नेहमीसारखा पायाची अडी टाकुन बसलो. मागच्या पाम ट्रीला डोकं टेकुन बसलो आणि फ्लॅश बॅकमध्ये गेलो.

त्यावेळी कोणालाही विचारलं कुठे होता तर पोरं सांगायची डिव्हाडर वर बसलो होतो. व्हीपीसीईओ या आमच्या कॉलेजचा हा खास कट्टा. डिव्हाडर. इथंच सगळी सुख-दुख शेअर केली जातात. पोरं जनरली फस्ट इअरच्या च्या शेवटी शेवटी  डिव्हायडरच्या नादी लागतात. डिव्हायडरवर अधिकार गाजवणारा बल्क मात्न लास्ट इअरच्या पोरांचा असतो. लेर बंक मारल्यावर, लेर सुटल्यावर, लायब्ररीत अभ्यास करु न, होस्टेल वर जाताना, पीएलमध्ये व्हायवा देऊन झाल्यावर आणि पेपर संपल्यानंतर पोरं गटागटाने या डिव्हायडरवर येऊन बसतात..

व्हायवा च्या काळात परीक्षकानं ने कोणाला किती झापलं.  मी कसं परिक्षकाला  पकवलं हे असले किस्से इथेच रंगतात. बाकी वेळी मग एकमेकांची  खेचणं  चालू असायचं. एखाद्याचं अफेअर सुरु  झालं असेल की बाकीचे त्याला  मार की प्रपोज   म्हणुन उचकवतात. नंतर पहिला प्रय} फसल्यावर  कसा गेम केला  म्हणून एकमेकांना टाळ्या देतात. कोणा दोघांच वाजलेलं असलं की इथे बाकीचे त्यांची पुन्हा मैत्नी घडवून आणतात. पेपर अवघड गेला तर दोस्त धीर देतात ती जागा हीच.  चला भावा चहा मारु  म्हणत इथंच अनेक प्रश्न सुटतात.

इथेच प्रत्येकाला आपल्यासारखे बाकीचे भेटायचे. मग स्ट्रेसचा निचरा व्हायला मदत व्हायची. हे सारं त्या कॅम्पसनं दिलं. फार कमी दिवस येतात हे कॅम्पसचे दिवस आयुष्यात.

 

 

 

Web Title: The name of the davidder named Campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.