ठळक मुद्देफोन आपल्या सतत हातात असतो, त्याकडे जर आपलं लक्ष नसेल तर कशाकडे आपण लक्ष देतो?

नितांत महाजन

फोन. म्हणजे मोबाईल फोन. सतत आपल्या हातात असतो, त्याच्याविषयी जगण्याची आपण कल्पना तरी करु शकतो का? काही वेळ बॅटरी संपली तरी आपण कासाविस होतो. सतत त्याच्यात डोकं घालून बसतो. जिथं आपण तिथं फोन अशी अवस्था. त्यामुळेच आपला फोन आपल्याविषयी इतरांना बरंच काही सांगतो. लोक आपला फोन पाहून आपल्याविषयी अंदाज बांधतात. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? पण ते शक्य आहे, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल फोन बरंच काही सांगतो इतरांना.
आणि याचा अर्थ महागडा फोन, आयफोन असं नव्हे. तर फोनचं रंगरुप, त्याचा स्क्रिन, त्याचं कळकट असणं, फुटलेलं असणं, त्याच्यावरचे तडे, त्याचं कव्हर, कव्हरला लावलेले स्टिकर, त्याचा कोड, अशी बरीच वर्गवारी करता येईल. पण एक नजर घाला अवतीभोवती जसे तुमचे मित्र तसाच त्यांचा मोबाइल दिसेल, तपासून पहा.
1) ज्यांचा मोबाइल फुटका, ते तसे केअरलेस असतात. कशातच त्यांचं फारसं लक्ष नसतं, कामचलाऊ धोरण असतं. ते स्वतर्‍वरही फारसं प्रेम करत नाही.
2) ज्याचं मोबाईल कव्हर देखणं ते शोशाईनवाले, सतत दिखावा करतात.
3) ज्यांचा मोबाइल कळकट, ते अस्वच्छ. अत्यंत बेताल जगतात.
4) ज्यांचा मोबाइल सतत हरवतो, ते वेंधळे.
5) मोबाइल अगदीच जुनाट ते ऑर्थोडॉक्स असतात.
6) बघा, असे काही अधिक व्यक्तिमत्वं आपल्या अवतीभोवती दिसतात का?


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.