ठळक मुद्देस्वातंत्र्य हे सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी जपलं पाहिजे.

 

-रेहमत दुर्गा कांबळे

आम्ही पुरुष. किती वर्ष निघून गेली पण आपल्या बोलण्यातुन स्त्रीचं शरीर हा पाठ अजुनही संपलाच नाही, किंवा असं म्हणावं लागेल की आपणच हा पाठ संपूच देत नाही. मला आठवतं समजायला लागलं अगदी तेव्हापासुनच स्त्रीयाचं शरीर, कपडे, दिसणं हा खूप महत्वाचा मुद्दा राहीला आहे.   वेळेसोबत सगळचं बदलुन जातं. आणि आपणही बदलतोच की, म्हणूनच आता मनात आणि मेंदुतही पुन्हा पुन्हा प्रश्न उठतोच!

आम्ही वेळेच्या प्रवाहात धोतरफेट्याहून शर्टपॅन्टवर आलो आणि शर्टपॅन्ट ते जिंन्स-टिशर्ट, हाफपॅन्ट, बिनाबाह्याचा शर्ट टिशर्ट, इथपर्यत  प्रवास झाला आमचा. बदललो आहोत की आपण!  पुरूषांनी स्वतर्‍च्या बाबतीत जे स्वीकारलं तेच स्त्रीयांच्या बाबतीत का नाही?आम्ही आधुनिक कपडे घालतो तो आमचा बदल, मग तरुणींचा का नाही. आम्ही बिनबाह्यांचा टिशर्ट घालून बाहेर पडतो ज्याचा गळा खोल असतो, हाफपॅन्ट अगदी मांड्यापर्यत पाय दिसतातच त्यावर काही कुणी टीका करत नाही.  घरासमोर, बरेचदा आमच्यातले काही काका लोक अगदी बिनबाह्याच्या बनियानवर आणि बरेचदा तर बिना बनियानवर उभे असतात बघतो आम्ही.  पण, आठवतही नाही की कुठल्याही प्रकारे आमच्या समोर किंवा आमच्या मागे अश्लिलतेचे नारे लावलेले !  आत्तापर्यत कुणीच का म्हटलं नाही की  पुरूषांनी असे कपडे घातल्याने समाजात अश्लिलता पसरते म्हणुन.

पण स्त्रियांवर असे आरोप सर्रास होतात. काळाच्या वेगात आम्ही पुरूष बदललोत, मग आमच्या सोबतच्याच, आमच्याच घरातल्या, शेजारच्या  स्त्रियांमधला मोकळेपणा सोसवत का नाही आम्हाला? मान्यच करायचं झालं तर, आम्ही बदललोय ते बाहेरून. आमच्या विचारात बंरच काही बदलायचं राहुन गेलं. आमच्यासाठीचे सर्व बदल सहज स्वीकारले, पण तुमच्यातला बदल स्वीकारणं कठीण जात आहे आम्हाला ? की या बदलाचीच भिती वाटतेय ? कुठल्याही महिलेला  विचारून बघा, ती साडीत असेल, ती सलवारसूट  मध्ये असेल किंवा मग जीन्स-टिशर्ट वा स्कर्ट मध्ये असेल, ज्यांना बघण्याची सवय, ते घाणेरडय़ा नजरेनं बघतातच. चारपाच, सातआठ वर्षाच्या निष्पाप मुलीच्या कपड्यात, शरीरात काय दिसतं की की ज्यामुळे वासनांध होतोय माणूस? याचा जरा तरुणांनीही विचार करायलाच हवा.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.