ग्राफिक टी’ज् : एक नवीन स्टाईल स्टेटमेण्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 05:27 PM2017-08-03T17:27:45+5:302017-08-03T17:30:12+5:30

टी शर्टावर मस्त मेसेज, किंवा चित्र ही काही नुस्ती फॅशन नाही, ते तुमचं स्टेटमेण्ट असू शकतं.

graphic tee is new fashion statement | ग्राफिक टी’ज् : एक नवीन स्टाईल स्टेटमेण्ट

ग्राफिक टी’ज् : एक नवीन स्टाईल स्टेटमेण्ट

Next
ठळक मुद्देग्राफिक टीशर्ट ही नवी फॅशनऑनलाइन शॉपिंग करणंही सोपं.स्टायलिशही आणि ट्रेण्डीही.

कॉलेज सुरु झालं की  कॅम्पस फॅशन म्हणून काय नवीन आलंय याकडे सगळ्यांचं लक्ष असतंच. यंदा चर्चा आहे ती, ग्राफिक टी’ज् अर्थात ग्राफिक असलेल्या टीशर्टची. आणि शिवाय हे असे शर्ट हे जेण्डरलेस आहेत. म्हणजे मुली आणि मुलं दोघंही याप्रकारचे टीशर्ट वापरुच शकतात. त्यामुळे यंदा नवीन काही ट्राय करुन पहायचा विचार असेल तर हे शर्ट ट्राय करायला हरकत नाही.

ग्राफिक्स असलेले किंवा काही मेसेज लिहिलेले, किंवा काही अक्षरं असलेले हे टीशर्ट. इट-स्लिप-रीपीट किंवा माय डॅड इज माय एटीएम किंवा ऑलरेडी डिस्टर्ब प्लीज डू नॉट डिस्टर्ब किंवा आय अ‍ॅम ऑन सायलेण्ट मोड असे मेसेज असलेले टीशर्ट तुम्ही अनेकदा पाहिले असतील.

असे मेसेज असलेले शर्ट घालून मिरवणं हे एरव्ही सोपं वाटत असलं तरी त्यासाठी धमक लागते. किंवा डेअरिंग लागतं. आपण जे घालतोय, ते लोक वाचणार आहेत, त्यातून आपल्याविषयी काहीबाही तर्क लढवणार आहेत. त्यातून आपल्याविषयी मत बनवणार आहेत. त्यामुळेच सोपं नाही हे टीशर्ट घालणं.

अर्थात घालणारे इतका विचार करत नाहीत, ते बिंधास्त घालतात. ज्यांना नवीन ट्रायआऊट करुन पहायला आवडतं ते तर विनासंकोच असे मेसेज वाले शर्ट घालतात.

शंभर-दोनशे रुपयांपासून असे शर्ट मिळतात. त्यामुळे प्रकरण महागडं नाही. फक्त आपल्याला शोभेल असं काही निवडलं म्हणजे झालं.

त्यामुळे यंदा फ्रेण्डशिप डेला कुणाला शर्ट गिफ्ट द्यायचा असेल तर असे शर्ट निवडता येतील!

एवढंच कशाला फार पर्सनल टच द्यायचा असेल तर स्वतर्‍ पेण्ट करुनही शर्ट गिफ्ट करता येऊ शकतात.

आपण कल्पना लढवल्या तर या ग्राफिक टीशर्टवर आपल्याला काय काय करता येऊ शकेल, विचार करून पहा!

काय सांगावं, कुणाला घरबसल्या बिझनेस आयडियाही सुचेल!

हातात कला असेल तर हे ही ट्राय करुन पहायला हरकत नाही. फॅशनेबलच आहे जमाना!

Web Title: graphic tee is new fashion statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.