निफाड तालुक्यातील चार रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:14 PM2018-11-01T18:14:50+5:302018-11-01T18:14:58+5:30

विंचूर:निफाड तालुक्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे ११४ किलोमीटर लांबीच्या चार रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला आहे. या रस्त्यांच्या सुधारणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 Four roads in Niphad taluka are main district road | निफाड तालुक्यातील चार रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

निफाड तालुक्यातील चार रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचिवण्याकरिता उपयोगी तसेच रस्त्यावरील गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने प्रमुख राज्यमार्ग आ िणराष्ट्रीय महामार्गांना जोडणारे प्रमुख रस्ते, सदर रस्त्यांवरील वाहतुक वर्दळ व गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्याचा होणारा वापर विचारात घेता



विंचूर:निफाड तालुक्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे ११४ किलोमीटर लांबीच्या चार रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला आहे. या रस्त्यांच्या सुधारणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोठ्या भागातील
निफाड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग ६९ ते मरळगोई विंचूर- सुभाष नगर-सोनेवाडी खु.कोळवाडी ते निफाड प्रमुख मार्ग ४४ ला मिळणाº्या इतर जिल्हा मार्ग १८३,८९व ३१ या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग १२४ बनला आहे. तसेच प्रमुख राज्यमार्ग २ नैताळे ते (राज्यमार्ग २७) दिंडोरी-खानगांवथडी- तारु लखेडले- तमासवाडी-झुंगे- खेडले झुंगे- कोळगाव- रु ई-धानोरे-डोंगरगांव- विंचूर- विठ्ठलवाडी-कोटमगाव- राज्यमार्ग २७ ला मिळणार्या इतर जिल्हा मार्गक्र मांक १८२,३२ व १७९ या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग १२५ क्र मांक प्राप्त झाला आहे. तसेच शिवडी-सोनवाडी- नैताळे- धारणगाव- खडक- रु ई- देवगाव ते राज्यमार्ग ७ ला मिळणाऱ्या इतर जिल्हामार्ग १८०ला प्रमुख जिल्हा मार्ग १२६ क्र मांक प्राप्त झाला आहे.प्रमुख जिल्हा मार्ग-६९ पाचोरे खु. म्हरळगोई-वाहेगाव- नांदगाव-धरणगाव-गाजरवाडी या राज्यमार्ग २७ ला मिळणाºया इतर जिल्हा मार्ग १८३ व १३१ ला प्रमुख जिल्हा मार्ग१२७ क्र मांक प्राप्त झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला असून, रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकुण लांबीत ११४ कि.मी.ने वाढ होऊन एकुण लांबी ३१६४.३१० कि.मी. तर इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांची एकुण लांबी २८७४०.२८० किलोमीटर झाली आहे.

...........माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाच्या दर्जामुळे रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध होईल. तसेच परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्यांचा फायदा होईल....पांडुरंग राऊत, युवा नेते,विंचूर

 

Web Title:  Four roads in Niphad taluka are main district road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.