रंगीत वॉटरप्रुफ काजळ कॅम्पसमध्ये हिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:08 PM2017-08-01T16:08:41+5:302017-08-01T16:09:22+5:30

काजळ काळंच असतं, कुणी सांगितलं, कलर्ड काजळच्या जमान्यात आपण करु ती फॅशन होऊ शकते.

Colorful waterproof mascot hit in campus! | रंगीत वॉटरप्रुफ काजळ कॅम्पसमध्ये हिट!

रंगीत वॉटरप्रुफ काजळ कॅम्पसमध्ये हिट!

Next
ठळक मुद्देपांढरं काजळ लावूनही डोळे टप्पोरे दिसू शकतील.आयलायनर आणि काजळ दोन्ही एकत्र लावणे टाळा.

कॉलेजात जायला लागलं की, दोन गोष्टी मुलींच्या आयुष्यात येतात. काजळ आणि आय लायनर. जिला उत्तम आयलायनर लावता येतं, ती खर्‍या अर्थानं ट्रेण्डी ठरू लागते.

गुलाबी आंखे जो तेरी देखी, तेरी आंखों के सिवा दुनियामें रख्खा क्या है, लडकी अखियोंसे गोली मारे,  ही अशी गाणी म्हणत नायक जेव्हा एखाद्या नायिकेच्या डोळ्यांची स्तुती करत असतो, तेव्हा आपण स्वतर्‍ला त्या नायिकेच्या जागी कधी बघू लागतो कळत नाही. ऐश्वर्या रायचे निळेशार डोळे, दीपिकाचे पाणीदार डोळे, परिणीती चोप्राचे खेळकर डोळे, बिपाशाचे मादक डोळे पाहून कोणीही खलास होतं. असेच डोळे आपल्याला मिळाले तर काय होईल अशा स्वप्नरंजनात तरूणी बुडून जातात. आणि तसे प्रयत्नही करायला लागतात. पण तुम्हाला कुणी सांगितलं की, आता पांढरं काजळ लावूनही डोळे टप्पोरे दिसू शकतील.

आता पावसाळ्याचा मौसम, कॉलेजेसही सुरू झालेली. तरूणींनाही मस्त तयार होऊन कॅम्पसमध्ये भटकण्याचे वेध लागलेले. पण ही तयारी करताना चेह-याची आणि महत्वाचे म्हणजे डोळ्य़ांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न सर्वानाच पडू शकतो. पण डोंट वरी  ते फारसं अवघड नाही.

पावसाळ्य़ातही डोळे सुंदर दिसावेत यासाठी काय काय करता येईल आणि तेही त्यांना हानी न पोहोचवता, त्याची ही लिस्ट.

 

* कधीही मेकअप करण्यापूर्वी किंवा चेह-यावर काहीही लावण्यापूर्वी तो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे.

* मेकअप करण्यापूर्वी क्लिजिंग, टोनिंग आणि मॉस्टरायझिंग करणेही आवश्यक आहे. क्लिजिंगमुळे त्वचेची छिद्रे मोकळी होऊन त्यातील मळ साफ होतो तर टोनिंगमुळे मोकळी झालेली छिद्र बुजतात.

*  कोणत्याही ऋतूमध्ये मेकअप करण्यापूर्वी ते प्रॉडक्ट चांगल्या कंपनीचे आहे ना हे तपासून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट वापरल्याने त्वचेला हानी पोहचत नाही.

*  मेकअपचे सामान वॉटरप्रूफ असणे कधीही उत्तम. कारण घामामुळे किंवा पावसाचे पाणी चेह-याला लागल्यास मेकअप पसरून चेहरा खराब होण्याची शक्यता आसते.

*  डोळ्य़ांचा मेकअप करताना आयश्ॉडो लावताना शक्यतो न्यूड रंगाची  निवडावी. न्यूड रंग म्हणजे स्किन टोनशी मॅच होणारे रंग. यामध्ये पीच, रोझ ब्राऊन, बेबी पिंक, वॉर्म ब्राऊन या शेड्सचा समावेश होतो. पावसाळ्य़ात जास्त गडद रंग वापरण्यापेक्षा नॅचरल रंग वापरण्यावर भर द्यावा.

* पावसाळ्य़ात ट्रान्स्परन्ट मस्कारा वापरल्यास अधिक उत्तम.

* आधी काजळ म्हटले की फक्त काळा हा एकच रंग समोर यायचा, पण आजकाल काजळातही अनेक रंग असतात. अगदी राखाडी, पांढ-यापासून ते निळ्या- लालपर्यंत. प्रत्येक ड्रेसला मॅचिंग होईल , असे काजळ आजकाल बाजारात सहज उपलब्ध असते. पण ते विकत घेण्यापूर्वी त्याचा दर्जा तपासून घेतानाच, ते आपल्या स्किन टोनला सूट होतय की नाही हेही तपासून पहावे.

*  ज्यांचे डोळे छोटे आहेत त्यांनी पांढ-या रंगाचे काजळ लावल्यास डोळे छान व मोठे दिसण्यास मदत होते. ते लावल्यावर ते डिफाईन करण्यासाठी बाहेरच्या बाजूला कॉटन बड्सच्या सहाय्याने काळ्य़ा रंगाचे काजळ लावा.

* ज्यांचे डोळे मोठे आहेत त्या डार्क ब्राऊन पासून ते सेट ब्लॅकर्पयत कोणत्याही रंगाचे काजळ वापरू शकतात.

* आयलायनर आणि काजळ दोन्ही एकत्र लावणे टाळा. आयलायनर लावल्यावर काजळाची गरज उरत नाही.

* आयश्ॉडोप्रमाणेच काजळही वॉटरप्रूफ असल्याची खात्री करा.

Web Title: Colorful waterproof mascot hit in campus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.