भन्नाट दोस्तांचा कॅम्पस कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, September 21, 2017 5:08pm

सगळे वेगवेगळे पण दोस्तीनं मात्र त्यांना एकत्र आणलं.

नुपूर जालेवार

आमचा कट्टा सगळ्यात आगळावेगळा आहे. तसा तो प्रत्येकालाच वाटतो आपापला. तसा तो आम्हाला पण वाटतो. कोणतीच गोष्ट सारखी नाही आमच्यात. कोणी अभ्यासात हुशार आहे , आपल्या  डिपार्टमेण्टमध्ये टॉपर आहे. कुणी जेमतेम. कुणी जाड, तर कुणाला मेकअपवरुन चिडवलं जातं. कोणी खुपच शांत म्हणून त्याला सायलेण्ट मोड  म्हणतो तर कोणाची इतकी बडबड कि तोंडाला चिकटपट्टी लावता आली असती तर बर झालं असतं असं वाटतं. कॉलेजच्या सगळ्या पार्टी  करण्यात आम्ही सगळे एकत्न असतो . अन्युअल फंक्शन ची धम्माल तर वेगळीच. तसंच आम्ही विविध  उपक्र मात पण सहभागी होतो. दौलताबादला कॉलेजतर्फे वृक्षारोपण केला आहे तिथे झाडांना पाणी देण्याचा उपक्रम मस्त झाला होता.   पहिल्यांदा सगळे फिरायला लेणीला गेलो होतो तेव्हा खूप मोठं भांडण झालं होतं वाटलं कि संपला ग्रुप पण परत दुसर्‍या दिवशी कॅम्पस मध्ये भेटलो तर सगळं पहिल्यासारखं होतं. कोणी जर कधी रडत असेल तर हसवणारे आम्ही कधी कधी सगळे एकासाठी रडत असतो.  दुसर्‍यांदा  आम्ही फिरायला गेलो तेव्हा आमच्यातल्या तिघींचा अपघात  झाला. त्यात मी ही होते. ज्याप्रकारे सगळ्यांनी सांभाळून घेतल्ं  त्याने तर आमची मैत्नी अजूनच घट्ट झाली . खरंतर कॅम्पसनेच आमचा ग्रुप तयार केला कारण सुरु वातीला सगळे दूर होते. आम्ही कोणी एका वर्गातले नाही . सगळ्यांचे विषय वेगळे आहेत . तरी पण आम्ही एकत्र  आलो .एखाद्या लेर नंतर रिकामा क्लासरूम शोधून तिथे गप्पा मारत बसणं नाहीतर गेम खेळणं.  कॉलेज कॅन्टीन मध्ये घरचे डबे भांडून खाण्याची मजाच भारी.  दुसरी कोणती वाईट सवय नसली तरी चहाची आहे हे तर कॅन्टीनच्या मावशीना पण चांगलं समजलं आहे . कोणाला पण सरळ नावाने हाक मारतच नाही त्यात गावरान तडका असतो आपुलकीचा. कोण काय विचार करतो आमच्याबद्दल त्याने आम्हाला फरक पडत नाही.  आता हे आमच शेवटचं वर्ष आहे . म्हणून एकेक दिवस भरभरुन जगत आठवणी जमा करतो आहोत.          

संबंधित

मुंबईतील ही कॉलेज आहेत विद्यार्थ्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये 
भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाच विभागाच्या ४० योजना आता आॅनलाईन, पालकांनाच भरावे लागणार शिष्यवृत्ती अर्ज
औरंगाबादचे ' हे '  ग्रंथालय आहे देशात पाचव्या स्थानी  
बाटली तीच, माल तोच, फक्त लेबल बदलले
कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑफलाइन होणार शासन निर्णय : जुक्टो संघटनेच्या प्रयत्नांना यश

कॉलेज कॅम्पस कडून आणखी

social media : जॉब ‘ब्रेक’साठी कसा वापराल?
कॅम्पसमधला डिव्हायडर नावाचा कट्टा
आम्ही तरुण खरंच बदललो आहोत का?
कॅम्पसमधल्या फ्लॅशबॅकमध्ये काही आठवणी सापडल्या तेव्हा...
क्यों की हर सॅक कुछ कहती है...

आणखी वाचा