यंदा खरीप पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:06 AM2019-04-17T01:06:07+5:302019-04-17T01:07:47+5:30

आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.

This year the area of cultivation of kharif crops will increase | यंदा खरीप पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार

यंदा खरीप पिकांचे लागवड क्षेत्र वाढणार

Next
ठळक मुद्देनियोजन भवनात आढावा बैठक : जिल्ह्यात ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आगामी खरीप हंगामासोबतच शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन व मागील वर्षाचा आढावा याबाबतची बैठक मंगळवारी नियोजन भवनात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक रवींद्र्र भोसले यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांचे हेक्टरी लागवड क्षेत्र वाढविण्याच्या सूचना केल्यात.
जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १० लाख ९१ हजार हेक्टर असून यातील ५ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. ४ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत आहे. ८९ हजार ४८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची लागवड होते. उन्हाळ्यात २ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्या विविध पिके घेतली जातात. १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सन २०१८- १९ च्या प्रत्यक्ष साध्य लक्ष्यांकाची माहिती सादर केली. भात, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा इत्यादी पिकांचे उत्पादन क्षेत्र आणि हेक्टरी उत्पादनासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी डॉ. खेमनार व विभागीय कृषी उपसंचालक भोसले उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यात बियाण्याची उपलब्धता, बियाणांची मागणी आणि वाटपाची स्थिती कशी आहे, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. पीकविमा, कर्जवाटप, मृदा आरोग्य पत्रिका, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अशा विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक उषा डोंगरवार, कृषी शास्त्रज्ञ, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.

महाबीजने उत्तम बियाणे पुरवावे
कमी कालावधीत काढणीला येणाऱ्या व जास्त उत्पादन देणाºया भाताच्या वाणांची जागृती करणे, गुलाबी बोंड अळी रोखण्याच्या उद्देशाने कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांनी उशिरा लावावे. बियाणाचा पुरवठा उशिरा करू नये, बोंडअळी तीन वर्षे कोशातच राहत असल्याने कृषी विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहावे. शेतकºयांना मार्गदर्शन करावे. महाबीजने कमी कालावधीत येणाऱ्या भाताचे वाण उपलब्ध करून देणे, अशा सूचना विभागीय कृषी उपसंचालक भोसले यांनी अधिकाºयांना दिल्या.

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई
कमी खर्च आणि अल्प कालावधीतील भात वाणांच्या मागणीत वाढ करावी, शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करता यावे, याकरिता व्यवस्थापन कृतीकाळ दर्शवणारी मार्गदर्शिका कृषी विभागाने तयार करावे. कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच आयोजित केल्या जाणार आहे. या प्रशिक्षणाला गैरहजर असणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिले.

Web Title: This year the area of cultivation of kharif crops will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.