उपेक्षित समाजालाही सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:39 PM2019-02-15T22:39:38+5:302019-02-15T22:40:06+5:30

मागील ७० वर्षांच्या काळापासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

We will also give the neglected community a representation in power | उपेक्षित समाजालाही सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देऊ

उपेक्षित समाजालाही सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देऊ

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मागील ७० वर्षांच्या काळापासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आगामी निवडणुकात वंचित बहुजन समाजाला भूलथापा देणाऱ्या राजकीय पक्षांना सत्तेतून उलथून टाकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
चिमूर येथील बी.पी.एड.कॉलेज मैदानात आयोजित धनगर, माना, हलबा, ढिवर समाजाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर धनगर समाजाचे नेते आमदारहरिभाऊ भदे, माना समाजाचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. रामेशकुमार गजभे, मच्छीमार संघर्ष समितीचे संयोजक माजी न्या. चंद्रलाल मेश्राम, आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, धनराज वंजारी, भारिपचे राज्य महासचिव कुशल मेश्राम, जिल्हा अध्यक्ष जयदीप खोब्रागडे ,के एल नान्हे, अनमोल शेंडे, मेळाव्याचे संयोजक अरविंद सांदेकर उपस्थित होते. पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भाजप सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून सत्तेत येण्याच्या प्रयत्न करीत असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडा. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वासुदेव श्रीरामे, संचालन प्रा. दिनकर चौधरी यांनी केले.

Web Title: We will also give the neglected community a representation in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.