कामगारांना वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:13 AM2018-08-19T00:13:35+5:302018-08-19T00:14:17+5:30

मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.

Waiting for workers to pay | कामगारांना वेतनाची प्रतीक्षा

कामगारांना वेतनाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देचार महिन्यांचे वेतन थकित : उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहेत. परिणामी या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कामांसाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती मानधन तत्त्वावर करण्यात आली आहे. सदर कामगार नित्यनियमाने आपले काम करुनसुद्धा त्यांचे वेतन अनियमीत करण्यात येते. याऊलट शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला नियमित वेतन देण्यात येते. परंतु, अत्यल्प पगारावर शासनाला सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन मात्र थकित ठेवण्यात येते. चंद्रपुरातील मेडिकल कॉलेज व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या ठेकेदारी कामगारांचे वेतन मागील चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांचे नाव शाळेत दाखल केली आहेत. मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यासं अडचण जात आहे. त्यामुळे थकित वेतन देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
अर्थमंत्र्यांना कामगारांचे निवेदन
कंत्राटी काम करणाºया कामगारांचे थकित वेतन देण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात विनावेतन काम करुन अभिनव आंदोलन केले होते. मात्र तरीसुद्धा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांनी अर्थमंत्र्याला निवेदन देण्यात आले. २२ आॅगस्टच्या आत थकित वेतन देण्यात यावे, अन्यथा २२ आॅगस्टला कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी वेतनची चौकशी करून कारवाई करण्याची तसेच शासनाच्या सर्वच विभागातील ठेकेदारी कामगारांना नियमित वेतन देण्याचे धोरण आखण्याचे आश्वासन दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात प्रहारचे सतीश खोब्रागडे, सतीश सांबरे, चिंचकर, सतीश घोनमोडे, दिनेश कंपू, किशोर महाजन, देवराव हटवार, निरगुडे यांच्यासह प्रहारचे कार्यतकर्ते तसेच कामगार उपस्थित होते.

Web Title: Waiting for workers to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.