चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:01 AM2018-01-20T11:01:32+5:302018-01-20T11:02:18+5:30

जिल्ह्यात शनिवारी सकाळी दोन भिन्न ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एकजण ठार तर काहीजण जखमी झाले आहेत.

Two accidents in Chandrapur district; One killed and some injured | चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देचिमूर-भिसी मार्गावर बसला ट्रकची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर:चिमूर भिसी मार्गावर शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसला एका ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. या बसला ओव्हरटेक करताना ट्रकने दिलेल्या धडकेत बसचा पत्रा कापत गेला. यात खिडकीच्या बाजूला बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसºया घटनेत सिंदेवाहीजवळ एका ट्रॅव्हल कंपनीच्या बसचा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

Web Title: Two accidents in Chandrapur district; One killed and some injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात