रस्त्याच्या मध्यभागावरील पाईपमुळे रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:05 PM2018-04-20T23:05:35+5:302018-04-20T23:06:13+5:30

पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने चिचाळा-फिस्कुटी मार्गाच्या मधोमध पाईप ठेवण्यात आले आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Traffic stops due to pipe on the middle of the road | रस्त्याच्या मध्यभागावरील पाईपमुळे रहदारीस अडथळा

रस्त्याच्या मध्यभागावरील पाईपमुळे रहदारीस अडथळा

Next
ठळक मुद्देपाईप हटविण्याची मागणी : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीने चिचाळा-फिस्कुटी मार्गाच्या मधोमध पाईप ठेवण्यात आले आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कंत्राटदार व प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांविषयी नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून पाईल हटविण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून मारोडा येथील २४ गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे काम मोठया धुमधडाक्यात सुरू आहे. सुमारे ४६ कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी खर्च करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सदर काम सुरू असून या कामाचे भूमीपुजन राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर काम एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. सदर काम करीत असताना चिचाळा ते फिस्कुटी मार्गावर या पाणी पुरवठा करणारे पाईप रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहे. हा मार्गावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. मात्र पाईप रस्त्यावर असल्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कंत्राटदार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून रस्त्यावरील पाईप त्वरीत हटविण्याची मागणी होत आहे.

सदर योजनेचे काम जलदगतीने सुरू आहे. त्यामुळे जागेअभावी रस्त्यावर पाईप ठेवण्यात आले असतील. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी कंत्राटदारला रस्त्यावरील पाईल बाजूला ठेवण्यास सांगण्यात येईल.
- प्रदीप बाराहाते, शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, मूल

Web Title: Traffic stops due to pipe on the middle of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.