ब्रह्मपुरीच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:58 PM2018-05-30T12:58:57+5:302018-05-30T12:59:15+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वांद्रा बिट पवनपार एरिया कक्ष १६५ मध्ये बुधवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका गावकऱ्याचा मृतदेह आढळून आला.

Tiger killed villager in Brahmapuri forest | ब्रह्मपुरीच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार

ब्रह्मपुरीच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार

googlenewsNext
ठळक मुद्देसिंदी तोडण्यासाठी गेले असता झाला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वांद्रा बिट पवनपार एरिया कक्ष १६५ मध्ये बुधवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका गावकऱ्याचा मृतदेह आढळून आला. जैराम कन्हाजी कोल्हे (७०) असे या इसमाचे नाव आहे. तो मंगळवारी संध्याकाळी जंगलात सिंदी तोडण्यासाठी गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो परत न आल्याने बुधवारी सकाळी त्याच्या घरच्यांनी त्याचा जंगलात शोध घेतला असता त्याच्या देहाचे अवयव आढळून आले. ही बातमी वनपरिक्षेत्रअधिकाºयांऱ्यांना कळवताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगावकर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Tiger killed villager in Brahmapuri forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ