टाकाऊ वस्तूपासून केले टिकाऊ खत पेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:00 PM2018-10-22T23:00:09+5:302018-10-22T23:00:29+5:30

माणसामध्ये कल्पकता असेल तर तो काहीतरी नवनिर्मिती करु शकतो अन् या कल्पकतेला जर मेहनतीची जोड असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसून येतो. भद्रावती येथील प्रगत शेतकरी प्रा. विलास कोटगिरवार यांच्या रुपाने अनुभवयास येत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले टिकाऊ खत पेरणी यंत्र सध्या नावारुपास येत आहे.

Sustainable fertilizer sowing machinery made from waste items | टाकाऊ वस्तूपासून केले टिकाऊ खत पेरणी यंत्र

टाकाऊ वस्तूपासून केले टिकाऊ खत पेरणी यंत्र

Next
ठळक मुद्देइतर शेतकऱ्यांसाठी लाभदायक : विलास कोटगिरवार यांच्या कल्पनेतून साकारले यंत्र

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : माणसामध्ये कल्पकता असेल तर तो काहीतरी नवनिर्मिती करु शकतो अन् या कल्पकतेला जर मेहनतीची जोड असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसून येतो. भद्रावती येथील प्रगत शेतकरी प्रा. विलास कोटगिरवार यांच्या रुपाने अनुभवयास येत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले टिकाऊ खत पेरणी यंत्र सध्या नावारुपास येत आहे. या पेरणी यंत्राद्वारे त्यांनी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा दिला आहे.
पावसाळ्यात वापसा (वाळाणी) लवकर येत नसल्याने औताद्वारे पिकाला रासायनिक खत देता येत नाही. वेळेवर मजूरसुद्धा उपलब्ध होत नाही. यासाठी प्रा.विलास कोटगिरवार यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे रासायनिक खत पेरणी यंत्र तयार केले आहे. त्यामुळे मजुरांकरवी रासायनिक खत देण्यापेक्षा या खत परेणी यंत्राद्वारे रासायनिक खत देता येते व नंतर डवऱ्याद्वारे रासायनिक खत जमिनीत गाडता येते. प्रा. विलास कोटगिरवार यांची भद्रावती ते तेलवासा रस्त्यालगत स्वत:ची शेती आहे. त्यांनी भंगारमध्ये टाकलेला हायटेक फवारणी पंप घेतला. त्याची फक्त टाळी तेवढी घेतली. बाकी सर्व जोडणी काढून टाकली. पंपाच्या टाकीला मागच्या बाजूने खाली छिद्र पाडून पाऊन इंची पिव्हीसी एमटीए बसविले. रासायनिक खत नियंत्रित करण्याकरिता त्याला एक व्हॉल्व बसविला. त्याखाली पाऊन इंची टी लावली. टिच्या बाजूला रिड्युसर बसवून त्याला रिड फटरबरी पाईप बसविला व पुढे अर्धा इंची पिव्हीसी पाईप चार फूट दोन्ही बाजूने बसवून रासायनिक खत देण्याचे पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना फक्त ३५० ते ४०० रुपये खर्च आला. पंपामध्ये रासायनिक खत टाकण्यासाठी ग्लायफोसेरची पाच लिटरची कॅन खालून कापून चाडी म्हणून वापरण्यात आली. प्रा.विलास कोटगिरवार यांनी अत्यंत कमी खर्चात तयार केलेल्या या यंत्राचा शेतकºयांना निश्चितच फायदा होवू शकतो.

शेतीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने तथा उत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत कमी खर्चात हे यंत्र तयार केले. टाकाऊपासून टिकाऊ असे खत पेरणी यंत्र आपणही तयार करा.
- प्रा.विलास कोटगिरवार, भद्रावती

Web Title: Sustainable fertilizer sowing machinery made from waste items

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.